नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग पाच

“शरीर जे करते, ते शरीराच्या हितासाठीच असते. “भाग दोन

या तत्वाच्या विरोधात जाऊन जेव्हा नको ती चिकित्सा घेतली जाते, तेव्हा औषधे कायम स्वरूपात सुरू होतात.

रक्तदाब वाढतो, तो शरीराचे नुकसान करण्यासाठी की हितासाठी ?
रक्तातील साखर वाढते ती तोट्याची की फायद्याची ?
गळ्यातील गाठी वाढतात, त्या शरीराला हितकर असतात की अहितकर ?
कांजिण्या गोवर कावीळ हे रोगजंतुमुळे होणारे आजार ?
मधुमेह, थायराॅईड, ह्रदयरोग, पीसीओडी ???

हे संशोधनाचे विषय आहेत.

आधी हितकारक आणि अहितकारक म्हणजे काय? याच्या व्याख्येपर्यंत पोचावे लागेल.?

शारीरिक हितकारक
मानसिक हितकारक
आध्यात्मिक हितकारक

रोग हे केलेल्या कर्माचे भोग असतात. असं आयुर्वेद मानतो. म्हणजे जेव्हा आपल्याला काहीतरी रोग होतो, तेव्हा आपण कुठेतरी शारीरिक, मानसिक अथवा आध्यात्मिक स्तरावर चुकलोय, हे लगेच लक्षात यायला हवं. ती चूक शोधून लगेच दुरूस्ती करायला हवी, केवळ तेवढेच नाही, तर तीच चुक परत होऊ नये यासाठी, अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, हे समर्थ वचन आठवावे.

साध्या सर्दी पासून ते अगदी कोणत्याही असाध्य व्याधीपर्यंत रोग होण्याची कारणे आपली आपल्यालाच शोधता यायला हवीत. फक्त दृष्टीकोन सकारात्मक हवा. आपल्यामधे काहीतरी सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्याने, किंवा आपल्या मनाने, किंवा आपल्या शरीराने दिलेली ही एक संधी आहे, असे समजावे. म्हणजेच आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक हेतू होय.

जी कारणे प्रत्यक्षात बघता येतात, ती शारीरिक.

जी कारणे सत्व रज तम या पातळीवर अभ्यासता येतात, ती मानसिक आणि ज्याची कारणे, शरीरातही नाहीत आणि मनातही नाहीत, ती सर्व आध्यात्मिक होय. विशेष ज्ञानाचा वापर करून या कारणांचा अभ्यास करता येतो. आणि लक्षात येते. हितकर काय अहितकर काय ?

कोणताही रोग अचानक होत नाही. फक्त त्याच्या शरीर प्रवेशाची वेळ आपल्याला कळत नाही, एवढंच !

“अचानक” दहशतवादी हल्ला झाला, असे आपण म्हणतो, कारण ते हल्ला करणार आहेत, याविषयी आपण सावध नसतो. या हल्ल्याची पूर्ण तयारी काही महिने तरी नकळत सुरू असते. ही कारणे काही प्रत्यक्षात, काही मानसिक स्तरावर तर काही वेळा आध्यात्मिक असतात.
असो. जेवढे चिंतन करावे, तेवढी उत्तरे मिळत जातात.

काल एक शंका विचारली गेली, गर्भावस्थेमधे ज्या उलट्या होतात, त्या चांगल्या की वाईट ?

शाळेत असताना, मराठीमधे एक धडा आम्ही शिकलो होतो, आतले आणि बाहेरचे ! हे उदाहरण नीट समजून घ्यावे.

लोकलमधे चढताना प्लॅटफॉर्म वर आणि डब्यात प्रचंड गर्दी असते. ‘बाहेरचे’ आत चढताना, ‘आतले’ तेवढाच विरोध करतात. ढकलून देतात. जरा वेळ गेला की, जशी लोकल परत गती घेते, तशी धावत्या गाडीबरोबर प्लॅटफॉर्मवरील काही ‘बाहेरचे’ धावत असतात. आता मात्र परिस्थिती बदलते, आता आतले, बाहेरून आत येणाऱ्यांना हात देऊन, आत येण्यासाठी मदत करतात. आणि ‘आतले’ बनवतात.

गर्भावस्थेत देखील, गर्भ हा बाहेरची एक वस्तु असते. सुरवातीला तिला शरीराकडून आतून स्विकारले जात नाही. बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. तेव्हा उलटी मळमळ सुरू होते. जेव्हा शरीराला आतून ( सकारात्मक) कळते, की हा गर्भ ढकलले तरी जात नाही, तेव्हा त्याला आतूनच सांभाळून घेतले जाते….

अगदी नऊ महिने नऊ दिवस !

— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
14.04.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..