नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग त्रेपन्न

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 8

स्नान करीत असताना काही सूक्ते म्हणावीत, काही सुभाषिते आठवावीत, गंगेची प्रार्थना करावी. सप्तनद्यांना आठवावे. या नद्यांच्या पाण्याने माझे बाह्य शरीर शुद्ध होत आहे, आणि त्यांच्या तीर्थरूप पवित्रतेने अंतर्मन निर्मळ होत आहे, विशेषतः ईश्वराने दिलेल्या भौतिक शरीराची मी पूजाच करीत आहे, असा भाव असावा.

देवाला जशी वस्त्र आणि उपवस्त्रे वहातात, तशी वस्त्रे स्वतः परिधान करावीत. देवाला कापसाची वस्त्रे वहावीत. जोडीने वहावीत, मधे मधे पिंजर लावून वहावीत. कापसाच्या वस्त्रांचे मणी करणे, ते सारख्याच आकाराचे होणे, मारलेला पीळ न सुटणे, त्यांची संख्या देवतेनुसार निश्चित असणे हे कर्मकांडामधे येते. ते तेवढेच महत्त्वाचे आहे.

देवायला वहायची वस्त्रे कापसाचीच असतात, हे यावेळी लक्षात आणून देऊ इच्छितो. भारतीय परंपरांना जो इतिहास आहे, त्या इतिहासाच्या आधारे असे सांगता येते की, भारतात कापसापासून अत्यंत तलम वस्त्रे तयार करणारे कारागिर होते. ते वस्त्र एवढी तलम बनवायचे की एक पाचवारी साडी घडी केली की, काडेपेटीच्या काडीएवढी व्हायची. भारतीयांचा विदेशांशी असलेल्या प्रमुख व्यापारामध्ये सूती कपडे, पोलाद, दुग्धजन्य पदार्थ, मसाले, सोने यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. उरूग्वे सारख्या छोट्याशा देशातील लोक सुद्धा आजही गोपालन हा भारताने दिलेला व्यवसाय आहे, असे ते अभिमानाने सांगतात. ज्यांच्याकडील गोधन दरमाणशी चार एवढे प्रचंड आहे. असो.

कापसाची शेती करणे, कापूस गोळा करणे, कापूस साठवणे, कापसाच्या वस्त्राला पीळ पाडणे, त्यापासून सूत तयार करणे, ते रंगवणे, हातमागावर आणि पुढे यंत्रमागावर त्याचे वस्त्र तयार करणे, त्या वस्त्राचा पोत ठरवणे आदि चाळीस प्रकारचे उप व्यवसाय गुरूकुलांमधून शिकवले जायचे, अशा ब्रिटीशांनी केलेल्या नोंदी आजही उपलब्ध आहेत. असोत. आज या इतिहासातील कालबाह्य गोष्टी आत्ता परत कशाला उगाळत बसायच्या असेही काही जणांना वाटेल. त्याचा अभ्यास सुद्धा आज करायचा नाही का ? आज विदेशातून भरमसाठ किंमतीला जी अनैसर्गिक कापडे आणली जात आहेत, ज्यामधे पाॅलीस्टर, होजियरी, नायलाॅन आदि शरीराला हानीकारक असणारे कपडे, भारतासारख्या समशीतोष्ण प्रदेशात येणारा घाम टिपून घेऊ शकत नाहीत, आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग, कर्करोग, अॅलर्जी निर्माण होताना दिसतात. ज्याचे उपचार देखील विदेशी औषधे वापरून करावे लागतात.

अजून तरी देवाला घालायची वस्त्रे कापसाची अथवा रेशमाचीच असतात. पूर्णपणे नैसर्गिक आणि पूर्णपणे आरोग्यदायी !

अध्यात्म आणि आयुर्वेद वेगळे नाहीतच. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत, हे अगदी सहजपणे कळते.
समजून घेणाऱ्याला !!!

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02.06.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..