नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सात

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक दोन

“शरीर जे करते, ते शरीराच्या हितासाठीच असते. ” – भाग चार

गर्भधारणा होणे ही अगदी नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण औषध घेऊन गर्भधारणा होऊ न देणे, हे शरीर नियमाच्या विरोधात आहे. स्त्री बीज निर्माण प्रक्रिया थांबवणे, लांबवणे हे स्त्री शरीरासाठी अयोग्य आहे. याचा परिणाम म्हणून गर्भाशयामधे गर्भ सदृश ग्रंथीची वाढ तर होत नसावी, ज्याला आज “फायब्राॅईड” असे नाव मिळाले आहे.

किंवा या ग्रंथी वाढण्याची अन्य कारणेही असू शकतील. पण……?

सोनोग्राफी मशीन आल्यामुळे या फायब्राॅईडचे निदान व्हायला लागले आहे. त्यापूर्वी हा (सो काॅल्ड) आजार नव्हता का ? होत असला तरी कळत देखील नव्हता. सुखी होत्या महिला.

आंध्रप्रदेश मधील कोणत्या तरी गावातील वय वर्षे चाळीस ते पन्नास या बहुतांश महिलांची गर्भाशये काढण्यात आली, अशी धक्कादायक बातमी आपण ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात ऐकली असेलच.

अगदी पाच पन्नास वर्षांपूर्वी पर्यंत घरात गोकुळ नांदत होते, मुले एकमेकांना आपटत होती, (संख्येने एवढी होती.) “कुटुंबाचे कल्याण” करण्यासाठी सरकारने ज्या योजना राबवल्या त्याचे एवढे गंभीर दुष्परिणाम होतील असे वाटले नव्हते. एका बाजूने लोकसंख्या जरी वाढत असली तरी शाळेतील पटसंख्या झपाट्याने कमी होत चालली आहे, दुसरीकडे “डाॅक्टर काहीही करा, पण आम्हाला मूल होऊ द्या हो,” असं सांगणाऱ्या जोडप्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

गर्भाशयाला, नैसर्गिकपणे गर्भधारण करणे हे काम करण्यापासून रोखणे, याला काय म्हणावे ? गर्भाशयातील ग्रंथींची अशी विकृत अवस्था निर्माण होण्याचे कारण शरीर प्रक्रियेच्या विरोधात जाणे आहे, असे म्हटले तरी ते चूक ठरू नये.

दरमहा येणारी मासिक पाळी. ही शरीराकडून होणारी एक प्रकारची शुद्धीच असते. आज औषधे घेऊन मोठ्या प्रमाणात ही शुद्धी अडवली जाते. विशिष्ट हार्मोन्स बदलवली जातात. एक हार्मोन बदलवले तर पुढची अनेक कार्ये बदलत जातात.

दरमहा येणाऱ्या मासिक पाळीमुळे रक्तातील अशुद्धी दूर केली जाते. तसेच मनाची शुद्धी पण होत असते. पण काही वेळा धार्मिक कार्यासाठी, परीक्षा, गेम्स, लग्न, प्रवास अशी कारणे सांगून शरीराच्या नियमांच्या विरोधात रजःशुद्धी रोखली जातेय. बदलणारे एक हाॅर्मोन इतर संप्रेरकांचे स्रवण बदवलत असते. हे आपण सोयीस्कर विसरतो. याचे रूपांतर कर्करोगामधे होऊ शकते, इतका गंभीर आजार नोंदलेला असून देखील शरीराच्या नियमितपणे चालणाऱ्या कार्यात प्रचंड उलथापालथ सुरू आहे.

शरीर नियमामधे अशी उलथापालथ केली तर त्याने, शरीराने काय करावे असे आपणाला वाटते ?

आपल्या नेहेमीच्या कामात, दुसऱ्याने केलेली ढवळाढवळ आपण मान्य करीत नाही. मग शरीराने तरी का मंजुरी द्यावी ?

मन बदलवणारी, ग्रंथीची कामे बिघडवणारी, विचार पालटवणारी गर्भाशयाचे गर्भधारण हे नैसर्गिक काम करू न देणारी विचारसरणी पीसीओडी सारख्या नवीन आजारांचे मूळ तर नसेल ?

— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021

16.04.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..