— कवी : तुळजाप्रसाद धानोरकर
आम्ही साहित्यिक
प्रिय बहीण,
तुझं आणि माझं नातं तसंच आहे,
जसं रेशीमबंध तु आज बांधलेस,
घट्ट,थोडंस सैल,आणि आपुलकीचं…
——————————————
◆आज मुद्दाम लिहावच लागलं…
—————————————–
आपलं हे नातं कधी बेगडी होऊ देऊ नकोस इतकंच…
तुझ्या सुखात पुढे पुढे करणारे
जर तुझ्या दुःखात दडून बसले
तर तु समजून घे कि त्या नात्याला फार भारीचं
आणि चमचम असं बेगड लागलंय,
पण तुला ती नाती कोणती आहेत
हे मात्र ओळखावं लागेल.
मी तशी आशा कधीच करणार नाही
कि तुला दुःख यावं पण परिस्थितीने कधी तशी वेळ ओढवून आणली तर,तुझ्या दुःखाच्या लक्ष्मण रेषेला आधाराला आधी समोर मीच राहील…
तुही प्रत्येक वेळेला तुझी वेडी माया घेऊन
आलीसच कि माझ्यासाठी.
तुझ्या सुखात नसलो तरी
दुःखात आधी समोर मीच राहीन
तु फक्त जाणीव ठेव बाळा…
वचन तुला..!
तुझाच भाऊराया
– © तुळजाप्रसाद धानोरकर
Leave a Reply