नवीन लेखन...

बोरापासून प्रक्रियायुक्त पदार्थ

Processed Food from Bor

सुकवलेली बोरे वापरुन अनेक पदार्थ करता येतात

सर्वसामान्य लोकांचे फळ मानले जाणाऱ्या बोर या फळाचे उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होते. परंतु काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे या फळाचे फार मोठे नुकसान होते व शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. यासाठी त्यांना बोराचे विक्री व्यवस्थापन तसेच बोरापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान माहीत असायला हवे.

बोराचा हंगाम प्रामुख्याने नोव्हेंबरपासून सुरू होऊन जानेवारी अखेरपर्यंत चालतो. हे फळ झाडावरच पिकणारे असल्यामुळे पूर्णपणे पिकल्यानंतरच त्याची काढणी केली जाते. बोरावर प्रक्रिया करून खाद्यपदार्थ तयार केल्यास ग्राहकांना बोराचा आस्वाद हंगाम नसताना देखील घेता येईल.

पाण्यात बुडू शकणाऱ्या बोरांच्या गरांचा लगदा करून त्यापासून रस काढता येतो. रसात सायट्रिक आम्ल, साखर व पाणी टाकून सरबत तयार करता येते. यातील घटकांचे प्रमाण बदलून स्क्वॅश आणि सिरप तयार करता येते. पिकलेल्या बोरांपासून उत्तम प्रकारची कॅण्डी तयार होते. उमराणा, कडाका या जातींच्या आकाराने मोठ्या असणाऱ्या बोरांपासून टुटीफ्रुटी तयार करता येते. तिचा उपयोग विविध प्रकारचे केक, फ्रूट ब्रेड, फ्रूट सॅलड, आइस्क्रिम यांमध्ये करता येतो.

बोरापासून सुकी बोरे व बोराची पावडर तयार करून ती जास्त काळ साठवता येते. ज्या वेळी बाजारात बोरे उपलब्ध नसतील त्या वेळी या पदार्थांचा उपयोग आहारामध्ये विविध मार्गांनी करता येतो. पावडरचा उपयोग सरबत तयार करण्यासाठी व पुडिंगसाठी होतो.

सुकवलेल्या बोरांचे लहान-लहानतुकडे करून त्यांचा उपयोग बेकरी पदार्थ व इतर अन्नपदार्थामध्ये करता येतो. खजूर, सुका मेवा तयार करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

कच्च्या बोरापासून जेली तयार करता येते. ही जेली फ्रूट ब्रेडमध्ये व बेकरी पदार्थ तयार करताना वापरता येते. बोराच्या फोडींपासून उत्तम प्रकारची लोणची, चटणी, चिवडा हे पदार्थही तयार करता येतात. कमी पिकलेल्या बोरांचा मुरांबा निर्जंतुक बाटल्यांमध्ये हवाबंद करून साठवता येतो.

— डॉ. विष्णू गरंडे ( कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद, मुंबई

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..