रामायण! भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेले एक महाकाव्य ! भारतीयांचा एक प्राचीन ग्रंथ ! रामायणाची कथा आपण लहानपणापासून वाचत ,पाहत व ऐकत आलेलो आहोत. बऱ्याच व्यक्तींना ही एक काल्पनिक कथा आहे असे वाटते परंतु आजच्या कलियुगात देखील रामायणाच्या वास्तवतेचे पुरावे दिसून येतात. आजच्या लेखामधे रामायणाच्या वास्तवाची प्रचिती दर्शवणारे हे पुरावे पाहणार आहोत.
१. अशोक वाटिका
रावणाने जेव्हा सीतेचे अपहरण केले तेव्हा सीताने रावणाच्या महालात राहण्यास नकार दिला. तेव्हा रावणाने सीतेला अशोक वाटिकेत ठेवले होते. अशोक वाटिका मध्ये अशोक वृक्ष मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याला अशोक वाटिका म्हणत. सद्यस्थितीमध्ये श्रीलंकेमध्ये ही वाटिका Sita Eliya येथे आढळून येते .
२. गरम पाण्याच्या विहिरी
रामायणामध्ये असा उल्लेख आढळतो की रावणाने आपल्या लंकेतील मंदिराच्या सभोवताली गरम पाण्याच्या विहिरी बांधल्या होत्या.याचे अस्तित्व श्रीलंकेतील kanniya या प्रांतात आजही आढळते. श्रीलंकेचा बारमाही गरम पाणी मिळविण्याचा हा चिरकालीन स्रोत आहे.
३. जटायू पक्ष्याची मूर्ती
रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा सीतेलाआपल्या वाहनातून लंकेला नेत असताना जटायू पक्षाने रावणाला विरोध केला होता. रावणासोबत झालेल्या संघर्षांमध्ये जटायू गंभीररीत्या जखमी होऊन ज्या पर्वतावर कोसळतो तो पर्वत आजही केरळ येथे अस्तित्वात आहे. तेथे जटायूची मूर्ति आहे. जी जगातील सर्वात मोठी पक्ष्याची मूर्ती मानली जाते. केरळच्या जटायू नॅचरल पार्क येथे ही जटायूची मूर्ती आढळते.
४. हनुमानाची पावले व सीतामातेचे मन्दिर
श्रीलंकेतील nuwara eliya येथे सीता मातेचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाजूला खळाळणाऱ्या पाण्याचा झरा आहे, त्याठिकाणी सीतामाता स्नान करत असे असे म्हटले जाते. त्या झरयाच्या बाजूलाच खडकावर हनुमानाची पावले उमटलेली आजही दिसून येतात.या शिवाय जवळच असलेल्या पर्वतावर देखील ही हनुमानाची पावले दिसतात.
५. लंका दहनाचा पुरावा
रामायणात सांगितल्याप्रमाणे हनुमानाने लंका दहन केले होते. दहन झालेली लंकेची ती जागा आजही श्रीलंकेमध्ये आढळते. तेथील माती पूर्णतया काळ्या रंगाची असून तो भूभाग सोडून सभोतालची माती ही श्रीलंकेच्या नैसर्गिक मातीप्रमाणेच आढळते .श्रीलंकेतील कोलंबोजवळील Ussangoda येतील समुद्रकिनारी भागात ही माती आढळते.
६. रामसेतू
मित्रांनो यानंतर पाहूया अशा पुरावाबद्दल माहिती ज्याने केवळ भारतीयच नाही तर अमेरिकन शास्त्रज्ञांनी देखील हैराण करून सोडले आहे व रामायणाच्या वास्तवतेवर विश्वास ठेवण्यास भाग पाडले आहे. अर्थातच हा पुरावा आहे रामसेतूचा जो भारत व श्रीलंकेच्या दरम्यान आजही दिसून येतो. नासाच्या संशोधकांनी देखील यावर संशोधन केले असून हा पूल प्राचीन असल्याचे व निसर्गनिर्मित नसल्याचे मान्य केले आहे. हा पूल निर्माण केला गेल्याचा कालावधी व रामायण घडल्याचा कालावधी सारखाच असल्याचे दिसून आले आहे.
७. तरंगणारे दगड
रामायणात उल्लेख असल्याप्रमाणे रामसेतू बांधण्याकरता वापरात येणारे दगड हे पाण्यावरती तरंगत होते.सद्यस्थितीमध्ये श्रीलंकेत असे दगड आढळून येतात. जे वजनाने भारी असून देखील पाण्यात बुडत नाहीत. असे का व्हावे याचे जगभरातील शास्त्रज्ञांनी संशोधन करून देखील त्यांना समाधानकारक निष्कर्ष काढता आला नाही.
८. संजीवनी पर्वत
रामायणानुसार लक्ष्मणास संजीवनी औषध देण्याकरता हनुमान हिमालयातील संजीवनी औषधी असणारे पर्वत उचलून लंकेत आणतो असा उल्लेख आहे. श्रीलंकेतील Hiripitiya या खेडेगावी Dolukanda या नावाने आजही तो पर्वत आढळतो .विशेष म्हणजे त्या पर्वतावरील वनस्पती वृक्षांचे गुणधर्म हे हिमालयातील वनस्पती सारखेच आहेत . श्रीलंकेत इतर ठिकाणी अशा वनस्पती आढळून येत नाहीत.
९. प्राचीन गुहा Cobra hood rocks
हनुमानाने लंका दहन केल्यानंतर रावणाने सीता मातेला अशोक वाटिकेतून काढून एका गुप्त गुहेत ठेवले होते. ती गुहा श्रीलंकेच्या पुरातत्व विभागाला सापडली असून संशोधकांनी त्याला cobra hood rocks असे नाव ठेवले आहे, विशेष म्हणजे या गुहेमध्ये नक्षीकाम व चित्रे आढळतात जी स्त्रियांच्या आवडी लक्षात ठेवून केलेली दिसतात. त्यामुळे सीता मातेला रावणाने तेथे ठेवले होते यास पुष्टी मिळते.
१०. रावणाचा महल
श्रीलंकेच्या पुरातत्व विभागाला असा महल सापडला आहे जो रामायण काळातील आहे असे म्हटले जाते. महालाच्या सभोवताली असे अनेक गोष्टी आढळल्या आहेत जे हा महल रामायणकालीन असल्याचे सिद्ध करतात.विशेष म्हणजे या महालापासून सीतामातेला ठेवलेल्या गुहेपर्यंत जाणारा गुप्त मार्ग सापडला आहे. शहराच्या विविध भागात जाणारे गुप्त मार्गदेखील या महालात आढळून आले आहेत.
वाल्मिकीकृत रामायणाच्या वास्तवतेचे आजही आढळून येणारे हे पुरावे भारतीय व्यक्तीच नाही तर जगभरातील संशोधकांना देखील रामायणावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात.
— विजयकुमार काशिनाथ पाटील
Leave a Reply