नवीन लेखन...

वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या मुख्य पद्धतींतील गुण-दोष

वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक पद्धतीचे गुण-दोष आहेत.

औष्णिक पद्धतीत दगडी कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यासारखे कार्बनयुक्त पदार्थ जाळावे लागतात. या ज्वलनक्रियेत मोठ्या प्रमाणांत कार्बन-डाय-ऑक्साईड वायुची निर्मिती होते. कार्बन-डाय-ऑक्साईड वायू हा पृथ्वीचे तापमान वाढवण्यास कारणीभूत ठरणारा मोठा घटक आहे. कोळसा जाळून निर्माण केलेल्या विजेच्या बाबतीत आपल्या वीजेच्या बिलात दाखवल्या जाणाऱ्या प्रत्येक युनिटमागे सुमारे एक किलोग्रॅम कार्बनडायऑक्साईडची वातावरणात भर पडत असते. (नैसर्गिक वायुद्वारे निर्माण केल्या गेलेल्या वीजेच्या बाबतीत हे प्रमाण याच्या निम्मं भरतं.) दगडी कोळशाच्या ज्वलनातून कार्बन-डाय-ऑक्साईडबरोबरच गंधक नायट्रोजन आणि यांची ऑक्सिजनबरोबरची वायुरूपी घातक संयुगंसुद्धा लक्षणीय प्रमाणांत निर्माण होतात. कोळशाच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारी राख ही वातावरणात शिरून आजुबाजूच्या परिसराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकते.

जलविद्युत प्रकल्पात कोणतंही रासायनिक प्रदुषण घडून येत नाही. मात्र जलविद्युत प्रकल्पांत पाण्याच्या पुरवठ्यातील चढ-उतार हे वीजनिर्मितीवर परिणाम घडवू शकतात. तसंच जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी जागांची निवडही काटेकोरपणे करावी लागते. या प्रकल्पांसाठी धरणं उभारायला लागणायी जागा या पाणी अडण्याच्या दृष्टीने सोयीच्या असाव्या लागतात; त्याचबरोबर पाणी अडल्यावर निर्माण होणाऱ्या मोठ्या जलाशयामुळे त्या परिसरातील जैवविविधत किती प्रमाणात नष्ट होईल हे ही लक्षांत घ्यावं लागतं अन्यथा पर्यावरणाच्या दृष्टीने उपकारक असणार वीजनिर्मितीची ही पद्धत पर्यावरणाला मारक ठरू शकते.

रासायनिक क्रिया घडून येत नसल्यामुळे, अणुऊर्जेव आधारित वीजनिर्मिती हीसुद्धा रासायनिकदृष्ट्या प्रदुषणविरहीत ठरते. अणुऊर्जेवर आधारित वीजनिर्मितीदरम्यान किरणोत्सारी कचरा निर्माण होत असल्याने या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं हे मात्र गरजेचं असतं.

कोळसा, नैसर्गिक वायू यासारख्या इंधनांच्या तुलनेत अणुइंधनाची ऊर्जानिर्मितीची क्षमता ही मुळातच खूप मोठी असते. शिवाय अणुइंधनाचा पुनर्वापरही करता येत असल्यामुळे अणुइंधन हे कार्बनयुक्त इंधनांपेक्षा हजारोपटींनी परिणामकारक ठरतं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..