नवीन लेखन...

तात्पुरता सदस्य

प्रश्न ३४) एखाद्या सदस्याचे भाग, हक्क, मालकीहक्क व हितसंबध गृहनिर्माण संस्थेत कशाप्रकारे हस्तांतरीत होते?

उत्तर: एखाद्या सदस्यास संस्थेमधील त्याच्या मालमत्तेचा भाग, हक्क, मालकीहक्क व हितसंबंध (इंटरेस्ट), नियमांमध्ये किंवा उपविधीमध्ये तरतूद केल्याप्रमाणे योग्य ती कार्यपद्धती अनुसरून नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे हस्तांतरित करता येईल. संस्थेच्या एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यावर, संस्था त्या संस्थेतील मृत सदस्याच्या मालमत्तेचा भाग, हक्क, मालकी हक्क व हितसंबंध मृत्यूपत्रीय दस्तऐवजाच्या किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्राच्या किंवा कायदेशीर वारसदारी प्रमाणपत्राच्या किंवा ज्या व्यक्ती मृत सदस्याची मालमत्ता वारसाने मिळण्यास हक्कदार असतील अशा व्यक्तींनी निष्पादित केलेल्या कुटुंब व्यवस्था दस्तऐवजाच्या आधारे एखाद्या व्यक्तीकडे किंवा व्यक्तींकडे अथवा नियमानुसार रीतसर नामनिर्देशित (नॉमिनेशन) केलेल्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येईल. परंतु संस्था एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर, कायदेशीर वारसाला किंवा वारसांना किंवा उत्तराधिकारी कायद्यानुसार अथवा मृत्युपत्रान्वये अथवा मृत्यूपत्रीय दस्तऐवजान्वये जी त्या सदनिकेची आणि भागांची हक्कदार असेल अशा व्यक्तीला अशा मृत सदस्याच्या जागी सदस्य म्हणून दाखल करून घेईपर्यंत, नामनिर्देशिताला तात्पुरता सदस्य म्हणून दाखल करून घेईल. परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्ती अशाप्रकारे नामनिर्देशित केलेली नसेल तर, समितीला विहीत केल्याप्रमाणे मृत्यू सदस्याचा वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधी असल्याचे दिसून येईल अशा व्यक्तीला संस्था तात्पुरता सदस्य म्हणून दाखल करून घेईल.

प्रश्न ३५) एखाद्या सदस्याने नामनिर्देशन केले असेल तर त्या सदस्या पश्यात सदर नामनिर्देशित व्यक्तीला महाराष्टात मालकी हक्क प्राप्त होते का?

उत्तर: नाही. आपल्या गृहनिर्माण संस्थांसाठी असलेल्या अधिनियमाचे नाव महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० हे सर्वाना माहित आहे. ज्या प्रमाणे महाराष्ट्रात सहकार कायदा आहे त्या प्रमाणेच भारतातील इतर राज्यांत त्यांचे स्वतंत्र सहकार कायदे आहेत. काही महिन्यांपूर्वी सोशल मिडीयावर फिरत असलेला एक मेसेज जो सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा दाखला दिला होता (इंद्रायणी वाही केस).

सदर केस ही सर्वोच्च न्यायालयात पश्चिम बंगाल या राज्याकडून दाखल झाली होती. सदर राज्यात पश्चिम बंगाल सहकारी संस्था अधिनियम, १९८३ अस्तित्वात आहे. त्या कायद्यात तशी तरतूद आहे. त्यामुळे न्यायालयाला तसा निर्णय द्यावा लागला. परंतु महाराष्टातील सहकार कायद्यात तरतूद नमूद केलेली असल्याने हा निर्णय आपल्या महाराष्ट्रातील सहकारी संस्थाना लागू नाही.

प्रश्न ३६) काही वर्षांपुर्वी सदस्याने नामनिर्देशन केले होते ते बदलता येते का?

उत्तर: नामनिर्देशन, सदस्यास कितीही वेळा बदलता येते. परंतु केलेल्या बदलास संस्था माफक मूल्य आकारते.

प्रश्न ३७) नामनिर्देशन केलेली व्यक्ती इतर व्यक्तीस दस्त बनवून दिल्यास घेणाऱ्या व्यक्तीला मालकी मिळू शकते का?

उत्तर: नामनिर्देशित व्यक्ती ही मालक नसल्याने त्या व्यक्तीने केलेला दस्तच चुकीचा असल्याने घेणाऱ्या व्यक्तीला मालकी मिळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कोणताही दस्त बनवताना कायदेशीर सल्ला घेऊन तयार केल्यास भविष्यातील चुका कमी करता येतील.

– अ‍ॅड. विशाल लांजेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..