सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा जन्म ३० मार्च १९५३ रोजी मालेगावला झाला.
आजपर्यत १६८ देशातील अंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त उज्ज्वल निकम यांनी आपली कारकीर्द सुरु केली जळगाव न्यायालयात व पुढे झाले सरकारी वकील. सरकारी वकील या नात्याने ते कायमच काम करत राहिले. उज्वल निकम यांचे वडील देवरावजी निकम मालेगाव येथील प्रसिद्ध वकील होते. उज्वल निकम यांनी आपले बीएससीचे शिक्षण पूर्ण झाल्यानतर जळगाव येथे वकिलीची पदवी मिळवली आणि जिल्हा न्यायालयात आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. त्यांची ओळख क्रिमिनल लॉयर म्हणून आहे. विशेष सरकारी वकील पदावर निकम यांची नियुक्ती झाली आणि मुंबई जळगाव असा प्रवास सुरु झाला. ते सोमवार ते शुक्रवार आपली ड्युटी मुंबई येथे पूर्ण करायचे आणि शनिवार व रविवार जळगावला येत असत. १९८९ मध्ये त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली. त्यांचा पहिला गाजलेला खटला आहे इंदुबाई खून प्रकरण होय.
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील पदावर नेमणूक झाली. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीची ही सुरुवात होती. १४ वर्षे चाललेल्या या खटल्यात १२९ आरोपीपैकी १०० जण दोषी ठरले. प्रत्येक खटल्याच्या मुळाशी जाऊन काम करण्याच्या सवयी आणि भक्कम पोलिस तपास यामुळे त्यांना प्रत्येक खटल्यात यश मिळत गेले.
कोर्टात नेहमी मोठमोठे युक्तिवाद करण्याकरिता उज्वल निकम प्रसिद्ध आहेच तर त्या सोबत ते एक शीघ्रकवी सुध्दा आहेत. कोर्टात त्यांनी केलेली शेरोशायरी किंवा चारोळ्या सर्वाचे लक्ष वेधून घेते. उज्वल निकम यांच्या कडे भारतातील हाय प्रोफाईल केसेस असतात. त्यामुळे त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. झेड सुरक्षा असलेले उज्वल निकम हे भारतातील एकमेव वकील आहेत. उज्वल निकम यांच्या सभोवताल ४७ शस्त्रधारी कमांडो नेहमी असतात.
भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे. उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित बायोपिक तयार करण्यात येणार आहे. ‘१०२ नॉट आउट’ या चित्रपटाचे निर्माते उमेश शुक्ला हे निकम यांच्यावर बायोपिक तयार करत असून त्यांच्यावर आधारित असलेल्या बायोपिकचे नाव ‘निकम’ असे असणार आहे. ‘ओएमजी- ओह माय गॉड’चे लोकप्रिय उमेश या बायोपिकचे दिग्दर्शन करणार असून सेजल शाह, आशीष वाघ, गौरव शुक्ला आणि भावेश मंडालिया हे या बायोपिकची निर्मिती करणार आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply