नवीन लेखन...

पुल,गदिमा व शरद पवार यांचा किस्सा!

गदिमा व पुल ही नावे माहित नाहित असा मराठी माणूस सापडणे कठीण!,पण त्यांच्या आयुष्यातही काही गमतीशीर प्रसंग घडतात त्यापैकीच एक.२००३ साली शरद पवारांनी बारामतीत गदिमांच्या नावाने मोठे सभागृह बांधले,त्याच्या उदघाटन प्रसंगी आम्हा माडगूळकर कुटुंबियांना मोठे आग्रहाचे निमंत्रण होते,त्याच वेळी शरद पवारांनी सांगितलेला हा किस्सा.

बारामतीतील साहित्यमंडळातर्फे एक कार्यक्रम घेण्याचे ठरले होते,प्रमुख पाहुणे म्हणून ग.दि.माडगूळकर व पु.ल.देशपांडे यांना आणायचे ठरले,दोघांनी ते मान्यही केले,दोन मोठे साहित्यिक आपल्याकडे येणार म्हंटल्यावर बारामतीकर ही खुश होते.त्याच वेळी बारामतीतून उदयास येणारे तरुण राजकीय व्यक्तिमत्व म्हणून दोघांना आणायची जवाबदारी शरद पवारांवर टाकण्यात आली.

दोन मोठ्या लोकांना आणायचे म्हणजे त्यांना एस.टी तर टाकून आणता येणार नाही,त्यासाठी गाडी पाहिजे,पण सर्वात मोठी पंचाईत म्हणजे त्यावेळी शरद पवारांकडे गाडी नव्हती! (परत वाचलत वाक्य?,अहो खरच नव्हती हो!).पण शरद पवारच ते त्यांनी एका श्रीमंत बागायतदाराला पकडले व त्याची गाडी मिळवली.ठरल्याप्रमाणे दोघे आले,कार्यक्रम अतिशय सुंदर झाला.

दोघांना परत सोडण्यासाठी पवार त्यांना घेऊन निघाले,ज्या बागायतदाराची ती गाडी होती त्याला ही अचानक शहरात काही काम निघाल्यामुळे तोही बरोबर निघाला,टिपीकल व्यापारी असतात ना तसा तो होता जाडजूड,काळाकुट्ट अगदी अंधाराच्या सावली सारखा,हाताच्या पाचही बोटात सोन्याच्या आंगठ्या,गळ्यात चेन.

पवारांनी दोघांची ओळख करुन दिली “हे ग.दि.माडगूळकर व पु.ल.देशपांडे मोठे लेखक आहेत हं!”,”बरं बरं नमस्कार नमस्कार!” बागायतदारांनी ओळख करुन घेतली.मग हवापाण्याच्या गप्पा सुरु झाल्या.गप्पा रंगात आल्या आणि अचानक बागायतदार महाशयांनी Bomb च टाकला “माडगूळकर व देशपांडे साहेब पण नक्की तुम्ही करता काय हो?” (म्हणजे धंदापाणी वगैरे असेल,लेखकाला खरच पैसे मिळतात का? व तो पोट कसे भरतो हा सामान्य माणसांना प्रश्न पडणे स्वाभाविक आहे,आणी हे महाशय तर हाडाचे व्यापारी बागायतदार!),आता आली का पंचाईत,गदिमा

अती कोपिष्ट,आता दोघे काय Reaction देतात याची पवारांना चिंता वाटू लागली. पण पुल शांतपणे उत्तरले “हे माडगूळकर आहेत ना ते पोस्टाच्या बाहेर बसुन लोकांना चिठ्या लिहून देतात व मी त्यांच्या शेजारी बसुन छत्र्यांच्या काड्या दुरुस्त करतो!”.

हा झाला अर्थात विनोदाचा भाग!,धान्याची कोठारे भरणार्‍याला कदाचित माहितही नसेल की येणार्‍या अनेक पिढयांसाठी मराठी साहित्यात अशी लाखो कोठारे ज्यांनी भरुन ठेवली आहेत असे दोन साहित्यिक आपल्याबरोबर आहेत

— सुमित्र माडगूळकर

Avatar
About सुमित्र माडगूळकर 8 Articles
महाकवी ग.दि.माडगूळकर यांचे नातू. गदिमांच्या साहित्य-चित्रपटांवर आधारित मराठी साहित्यातील पहिली वेबसाईट गदिमा.कॉम चे निर्माते. गदिमा.कॉम या पहिल्या मराठी मेगा संगणक सीडीची निर्मिती. जोगिया या सोनी म्युझिक-इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समुहाच्या सहकार्याने काढलेल्या मराठी म्युझिक अल्बमची निर्मिती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..