नवीन लेखन...

पुनरुत्थान – गोव्यातील मंदिरांचे

सोळाव्या शतकात त्याकाळचा गोवा म्हणजे तिसवाडी, बार्देस व सालसेत या तालुक्यात जबरदस्त प्रहार हिंदू संस्कृती वर झाला. जे काही हिदू संस्कृती म्हणून असेल ते नामशेष करायचा त्या काळी क्रिस्ती मशिनरी व राजकर्तां वीडाच उचलला होता. जी काही पावल उचलली, आदेश निघाले त्यांच्या नोंदी पोर्तूगिज भाषेत आजही उपलब्ध आहे. फक्त धर्म बदलला नाही तर रीती रीवाज, आहार, पेहराव सगळ बदलायला लावल. हिंदूचे म्हणून जे समजल जाईल व ते कराल तर कठोर शिक्षा भोगावी लागत असे. पण आता पुनरुत्थान झालेल आहे. गोव्याच्या मुळ हिंदू संस्कृती ने परत वर्चस्व प्रस्थापित केलेल आहे.

रुई गोम्स पेरेराच्या संशोधना प्रमाणे एकूण ५५६ (तिसवाडी ११६, बार्देस १७६ व सालसेत २६४) मोठी देवळ जमीनदोस्त करण्यात आली. यातील काही देवतांच्या मुर्ती नदी पलिकडील शेजारच्या प्रदेशात स्थापित झाल्या त्या खालील प्रमाणे :

तिसवाडीतील खालील गावातून स्थलांतरित झालेल्या देवताः

1. आझोशी Azossim लक्ष्मीनारायण – कुंडई
2. करमळी Carambolim ब्रम्हा – सत्तरीत
3. चिंबल Chimbel भगवती- माशेल (चिंबलकरीण )
4. चोडण Chorao १. रवळनाथ, २. भाऊकादेवी, ३. मल्लिनाथ, ४. भगवती, ५. देवकी, ६. संतपुरूष, ७. बाराझान, ८. नारायण, ९. भाटेश्वर, १०. चंद्रश्वर, ११. Dadd-sancol — माशेल
5. कुंभारजुवे शांतादुर्गा – माशेल (कुंभारजुवेकरीण)
6. दिवाडी Divar गणेश – खांडोळा
7. गन्से Gancim दुर्गादेवी – मडकई आणि कुंडई (नवदुर्गा)
8. जुवे Jua १. रवळनाथ, २. शांतादुर्गा, ३. क्षेत्रपाळ – खांडोळा (वीर्डी)
9.तळावली Talaulim शांतादुर्गा, रवळनाथ – माशेल
१०. गोवा वेल्हा Goa Velha चामुंडेश्वरी – वरगाव-पिळगाव

बार्देस तालुक्यातील देवता कुठ कुठ स्थलांतरीर झाल्या हे वाचाः

१. हळदोणेः भगवती मये येथे नेली गेली व तेथून खांडोळा येथे नेऊन स्थापित झाली.
२.हणजुणाः भुमीका मांद्रे येथे नेली.
३. आसगावः १. भुमीका, २. भगवती, ३. चोवतेवरील ४. रवळनाथ, ५. सती ६. पुर्वेचो रवळनाथ मांद्रे येथे नेले.
४. कलंगुटः शांतादुर्गा नानोरा, डिचोली
५. कामुर्लीः भगवती तुवे, पेडणे
६. कांदोळीः शांतादुर्गा नानोरा, डिचोली
७. गीरीः भगवती – अडवळपाल, डिचोली
८. मर्नाः बेताळ, – पाळी डिचोली
९. मयडे मौर्याः १. रवळनाथ, २. सातेरी, ३. महादेव, ४. रामपुरूष, ५. वांतीपुरूष, ६. सतपुरूष – मुळगाव डिचोली
१०. नाचिनोला नास्नोडाः १. वेताळ, २. रामनाथ, ३. महालक्ष्मी, ४. रवळनाथ – अडवळपाल डिचोली
११. नादोराः १. भुतनाथ, २. माऊली – मेणकुरे
१२. नेरूळः महालक्ष्मी नेरूलकरीण – नाराव डिचोली
१३. पिलेर्ण, पिर्णाः सातेरी – नाराव शांतादुर्गा पिलर्णेकरीण
१४. पोंबुर्पाः सातेरी, रवळनाथ- मुळगाव
१५. रेवोराः भुतनाथ, माऊली – मेणकुरे, डिचोली
१६. साळगावः बेताळ – अडवळपाल
१७. सांगोल्डाः १. सातेरी, २. नारायण, ३. गणेश, ४. रवळनाथ, ५. महादेव, ६. सती – बोर्डे डिचोली ७. वनदेवी, ८. नारायण – मुळगाव, डिचोली व्हाया अडवळपाल
१८. शिरसईः १. महालक्ष्मी, २. वेताळ, ३. केळबादेवी – धारगळ, पेडणे
२०. वेर्लाः १. सातेरी, २. नारायण, ३. रवळनाथ – माशेल, फोंडा

सालसेत मधील स्थलांतरीत मंदिरे

१. मडगावः दामोदर – जांबावली
२. मडगावः मठ – पर्तगाळ
३. आरोशीमः भोगूइश्वर – तळावली, फोंडा
४. असोळणाः १. बेताळ, २. सातेरी, ३. पुरूष देखेच्य़ो – फातोर्पा
५. बाणावलीः १. बाणेश्वर, २. संकेश्वर, ३. नारायण, ४. भैरव, ५. कन्तारझादेवी, ६. सातेरी, ७. देऊण – अंकोला, कर्नाटक
६. बेताळबाटीमः बेताळ – कपिलेश्वरी, कवळे, फोंडा
७. कामोर्ली, रायाः कामाक्षी – शिरोडा, फोंडा
८. कोलवाः रवळनाथ – तळावली, फोंडा
९. कुठ्ठाळीः मंगेश – मंगेशी, प्रिओळ, फोंडा
१०. कुंकळीः शांतादुर्गा, अकारूडेगूय, महादेव, गोळचो-पाईक, सत-पुरूष,सिद्ध-पुरूष,राम, क्रुष्ण, गोडेमाता, नारायण, रामनाथ, सातेरी, दुर्गादेवता – फातर्पा, केपे
११. कुरतोरीमः १. सातेरी, २. चांदेश्वरी – गुड्डो, ३. आवेड्डम, ४. चंदावड्डी.
१२. लोटलीः १. रामनाम, २. बेताळ, ३. सातेरी(शांतादुर्गा) ४. सिद्दनाथ – बांदोडा; ५. वामनलो – वामनेश्वर, दौली, कवळे,
१३. नागावः १. भगवती – माशेल; २. इश्वर, ३. नारायण, ४. सातेरी, ५. रवळनाथ – अंकोला, कर्नाटक
१४. कुओलशीः १. सातेरी, २. नारायण, ३. भगवती, ४. ग्राम-पुरूष – कवळे, फोंडा
१५. राकईः इश्वर – महादेव, आगापूर, फोंडा
१६. रायाः कामाक्षी, रायेश्वर, लक्ष्मी-नारायण – शिरोडा, फोंडा
१७. सांकवाळः १. सातेरी-शांतादुर्गा, २. ग्राम-पुरूष,३. नरसिंह, ४. लक्ष्मी-नारायण- वेलींग, फोंडा; ५. विजयदुर्गा – केरी, फोंडा.
१८. वेर्णाः महालसा – म्हार्दोळ, फोंडा
१९. वेर्डाः १. दुर्गादेवी, २.महादेव – ओर्णा, बाळ्ळी.

जरी ५५६ मोठी मंदीरे मोडली गेली तरी जवळजवळ ५० गावातून ७०-८० देवताच स्थलांतरीत झाल्याची आता नोंद सापडते. या देवता आपल्या मुळ स्थानी वर्षातून एकदातरी गेल्या पाहिजेत. चिमुलकरीण, कुभारजुवेकरीण अशा अवघ्याच काही देवता आपल्या मुळ गावी एकदा दर वर्षी जातात. दर वर्षी होणारा हा देवतांचा प्रवास पर्यटकांना आकर्शित करण्यासाठी वापरला गेला पाहिजे.

जर पन्नास देवतांनी दरवर्षी असा मुळ स्थान प्रवास सुरू केला व गोवा पर्यटन विभागाने त्याचा गाजावाजा करून भारतभर/जगभर सांगितले व “पुनरुत्थान” बद्दल ठणकावून सांगितले तर निश्चितच गोव्याकडे पहाण्याची पर्यटकांची नजर बदलेल. गोवा हे यात्रास्थान बनायला वेळ लागणार नाही.

— श्रीकांत बर्वे

From the book “Goa Hindu Temples and Deities by Rue Gomes Pereira

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..