( उषःकाल होता होता वर आधारित )
या कवितेचा कवी माहित नाही, पण त्याला सलाम…
आकाशस्थ होता होता
भुमिगत झाली
अरे पुन्हा प्रवाशांनो
चालवा सायकली||धृ||
आम्ही आता मेट्रोचीही
आस का धरावी,
जे कधीच नव्हते
त्याची वाट का पहावी.
कशी पीएमटीने जनता
गुदमरुन गेली,
अरे पुन्हा प्रवाशांनो
चालवा सायकली.||धृ||
गल्लीबोळातुनी धावे आता
ही बीआरटी,
आम्हावरी अपघातांची
उडे धुळमाती;
आम्ही ते पुणेकर ज्यांना
एकही न वाली.
अरे पुन्हा प्रवाशांनो
चालवा सायकली. ||धृ||
उभे पुणे झाले आता
एक बंदिशाला,
इथे वारा पर्वतीचा
धुराने जळाला.
कसे पुणे दुर्दैवी अन्
नागपुर भाग्यशाली;
अरे पुन्हा प्रवाशांनो
चालवा सायकली. ||धृ||
धुमसतात अजुनी इथल्या
वडाफचे निखारे,
जादा भाडे मागत सुटती
रिक्षावाले सारे;
गाजरेच मेट्रोची ही
आम्हाला मिळाली.
अरे पुन्हा प्रवाशांनो
चालवा सायकली ..! ||धृ||
Leave a Reply