अनेक भाषांत लिहिणारे पंजाबी साहित्यिक कर्तारसिंग दुग्गल यांचा जन्म १ मार्च १९१७ रोजी रावळपिंडी येथे झाला.
कर्तारसिंग दुग्गल हे पंजाबी, उर्दू, हिंदी, इंग्लिश अशा भाषांमध्ये लिहिणारे मोठे कवी, कथाकार आणि नाटककार म्हणून ओळखले जातात. त्यांनी फाळणीच्या, तसंच आणीबाणीच्या काळातल्या पंजाब संबंधी लेखन केलं आहे. अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालं आहे. त्यांना लेखनाबद्दल साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली होती. तसंच भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना गालिब पुरस्कार, भारतीय भाषा परिषद पुरस्कार, सोव्हिएत लँड पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते.कलाकारांना व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांनी खासदार असताना पंजाबमध्ये ‘विरसा विहार’ या नावाने सांस्कृतिक केंद्रं उभारली होती. ते अनेक वर्षं ‘ऑल इंडिया रेडिओ’चे डायरेक्टर होते. राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशनसारख्या महत्त्वाच्या संस्थेचे ते संस्थापक होते. सोनार बंगला, झीनत आपा यांसारखे २४ कथासंग्रह, सरद पूनम की रात, तेरे भन्हे यांसारख्या दहा कादंबऱ्या, तसंच दोन काव्यसंग्रह आणि सात समीक्षासंग्रह असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. कर्तारसिंग दुग्गल यांचे२६ जानेवारी २०१२ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply