ज्या ज्या वेळी येई संकट, धांव घेत असे प्रभूकडे ।
संकट निवारण करण्यासाठीं, घालीत होता सांकडे ।। १
चिंतन पूजन करूनी, करीत होता प्रभू सेवा ।
लाभत होती त्याची दया, त्याला थोडी केव्हां केव्हां ।। २
संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा ।
कामी येईल पुण्य , विचार करीतां भविष्याचा ।। ३
संचित पुण्य आजवरचे, कार्य सिद्धीला लागते ।
सुख दु:खाच्या हर समयीं, ठेवा मुखीं प्रभू नामाते ।। ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply