हल्ली पुरस्कारांचा महापूर आला आहे.गल्ली ते दिल्ली त्याचा सुकाळ आहे. देणारे आणि घेणारे त्यासाठी उतावीळ आहेत. बालवाडी पासून त्याची सुरुवात होते.आमच्या बंड्या भाषणात पहिला आला आहे.नाव न सांगता येणारा बंड्या स्वातंत्र्य याविषयावर बक्षिस मिळवतो.हि ढिगारभर बक्षिसे खिरापत वाटावी तसी वाटली जातात. छपाईचा खर्च सोडला तर बाकी काय.एक रूपयांची पेन्सिल? पुन्हा वस्तूचा भाव नाही तर वस्तूतला भाव बघितला पाहिजे हे फूकटचे तत्त्वज्ञान! गणेश मंडळाचे पुरस्कार हंगामी असतात.त्याचा आनंद घरी येईपर्यंत टिकतो. सरकारी पुरस्कार हे विशेष असतात.ते मिळवायची पद्धत असते.गुणी लोकांचा शोध सरकार घेत नाही.आपणच तसं त्यांना
सांगावं लागतं. वर्तमानपत्रे पुरस्कार प्रदान करतात.प्रसिद्धी देतात. हजारों प्रकारच्या स्पर्धा.त्यांचे पुरस्कार,बक्षिस वगैरे यांनी हैदोस मांडला आहे.कवडीमोलाचे हे पुरस्कार बाजारबुनगे पर्यावरण करत आहेत.त्याचा गवगवा करून
तुम्ही भरत आहेत.
राज्यस्तरीय पुरस्कार,हे बिरूद हास्यास्पद झाले आहे.ऊठसुट कुणीही पुरस्कार देतो, कुणालाही मिळतो.जाहिरात होते.मोठेपणाचा भास निर्माण केला जातो. सत्कार, होर्डिंग्ज, शुभेच्छा याचा वर्षाव होतो. पुरस्कार उदंड जाहले म्हणण्याची वेळ आली आहे.पुरस्कारासाठी,मोठेपणा साठीच काही करायचे असते का? नाही तर मग हारतुरे,स्वागतसत्कार कशासाठी? हा उथळपणा कुठवर टिकणार? काहीतरी टिकावू, प्रसिद्धीपासून दूर असलेले काहीच करता येणार नाही का? संतांनी, विचारवंतांनी, देशभक्तांनी, समाजसेवकांनी आपले आयुष्य खर्ची घातले तरीही जिवंतपणी त्यांना मोठेपण मिळाले नाही.आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी माणसे.गल्लीबोळातल्या एखाद्या बक्षिसाने किंवा पुरस्काराने हुरूळून जातो.लहान यशानं हुरुळून जाणारी माणसे मोठे काम कधीच करू शकत नाही.हा बालिशपणा सोडला पाहिजे. अमूक पुरस्कार प्राप्त, अमुक भुषण तमूक भूषण हि दूषणे वाटली पाहिजे.देणारे नालायक असले तरी घेणारे सावध पाहिजेत दोनशे बायांमधून विश्वसुंदरी ठरावी तसे हे पुरस्कार असतात.कुणीही स्पर्धक नसतांना तालुक्यातून प्रथम,जिल्ह्यातून प्रथम? ज्याचे पुस्तक कोणते आहे कुणालाही माहीत नसतांना अशा साहित्यिकांना डझनभर पुरस्कार! एखादी कविता लिहून कुणी कविभूषण पुरस्कार प्राप्त.कोण देतो?कोण तो? जातीधर्माच्या नावाने पुरस्कार.सगळ्या जातीचे भूषण पुरस्कार आहेत. बाळ बुद्धी पुरस्काराने हुरुळून जाते. खिरापत वाटावी तसे पुरस्कार वितरण होते. विवेकबुद्धी जागृत व्हावी एवढीच अपेक्षा.
-नारायण खराद अंबड
Leave a Reply