आजच्या दिवशी १९८२ रोजी कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित ’पुरुष’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला होता.
जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि मराठी रंगभूमीवर गाजलेलं ‘पुरुष’ हे नाटकात पुरुषी मनोवृत्ती आणि त्या मनोवृत्तीला बळी पडलेल्या एका स्त्रीची कथा पुरुष या नाटकातून मांडण्यात आली आहे. मुळातच पुरुषांमध्ये असलेला अहंकार आणि त्याला बळी पडणाऱ्या स्त्रिया यावर य़ा नाटकाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलंय. नाना पाटेकर, उषा नाडकर्णी, रिमा या दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने एके काळी हे नाटक खुपच गाजवलं होतं.
https://www.youtube.com/watch?v=nkBQnmA4PfM
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply