नवीन लेखन...

नाटककार, दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर

कट्यार काळजात घुसली’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणणारे नाटककार, दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर हे नाट्य वर्तुळात दारव्हेकर मास्तर या नावाने परिचीत होते.

त्यांचा जन्म १ जुन १९२६ रोजी झाला. अतिशय अभ्यासू,विचारवंत,आणि वक्तशीर असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. अनेक नाटकांना त्यांचे दिग्दर्शन लाभले होते. ते संगीत आयुष्यभर जगले आणि त्याची परिणति म्हणजे संगीत नाटक कट्यार काळजात घुसली. संगीत आणि कविता हा त्यांचा बालपणा पासूनचा गुण. तेजो निधी लोह गोल हे गीत त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी लिहीले होते. त्यांचा जन्म व शिक्षण नागपुरात बी.एस.सी,बी.टी.एम.ए, एल.एल.बी एवढे उच्च शिक्षण घेऊनही त्यांनी नाट्यक्षेत्रात पाय रोवला. १९५१ मध्ये रंजन कला मंदिर या नावाने नाट्यसंस्था काढली, लहान मुलांचे साठीही त्यांनी अनेक नाटकांची निर्मिती केली.

१९६१ साली त्यांनी दिल्ली येथे दूरदर्शनचे सहाय्यक संचालकपद सांभाळले, मा. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी लिहीलेले व पं. जितेंद्र अभिषेकींच्या बहारदार संगीताने सजलेलं हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचला. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी मधुसुदन कोल्हटकर व लता अरुण यांना घेऊन नटसम्राट दिग्दर्शित केले. या प्रयोगाचे श्रेयस इतकेच की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या गावांमधे नटसम्राट पोचला नव्हता तिथपर्यंत तो पोचला. मा.वि.वा शिरवाडकर यांनी तर नटसम्राट हे नाटक मास्तर दिग्दर्शित करणार असतील तरच मी देईन, असे म्हटले होते. मास्तरांनी आपल्या नाटकांना आपल्या अपत्यासारखे जपले.

व्यावसायिक रंगभूमीवर नटसम्राट खेरीज अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, कट्यार काळजात घुसली आदी नाटकांचे यशस्वी प्रयोग त्यांनी केले. मा.पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे लेखन, डॉ. वसंतराव देशपांडे, फय्याज यांच्यासारखे अव्वल दर्जाचे गायक कलाकार आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत यामुळे ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ हे नाटक गाजले, अजरामर झाले. त्या नाटकाने मराठी रंगभुमीवर इतिहास घडवला.

पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन २१ सप्टेंबर १९९९ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या काही रचना
घेई छंद मकरंद
दिन गेले भजनाविण
जा उडुनी जा पाखरा
तेजोनिधी लोहगोल
दिन गेले भजनाविण सारे
मुरलीधर श्याम हे नंदलाल
या भवनातिल गीत पुराणे.

 पूजा
poojapradhan323@gmail.com
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..