ग्रंथालय म्हणजे पुस्तकांच घर. या घरात वास्तव्यास असणारी बहूरंगी विविध विषयांना स्पर्श करणारी असंख्य पुस्तकं जी आपल्या वाचनाची, ज्ञानाची भुक अविरत भागवणारी स्त्रोत्र असतात. ही ग्रंथालय निर्माण करणं ही बुद्धीवंतांची लक्षणं आहेत व असा समाज म्हणजे सुसंस्कृत समाज असतो. तो ज्ञानदानासाठी सदैव तत्पर असतो. अशिच तत्परता आम्हास पहावयास मिळाली ती आमच्या मिठारवाडी या गावात१९९० साली.
आमचं गाव तसं डोंगर द-यात रानावनात वसलेलं खच्चुन हजार लोकवस्ती असलेलं हीरव्यागार डोंगर दरीने पावसाळ्यात नटलेलं, थंडगार हवेशीर ऑक्सीजन ने उन्हाळ्यात खचाखच भरलेलं असं हे आमचं मिठारवाडी हे गाव पन्हाळ्याच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात एक सुसज्ज ग्रंथालय निर्माण होईल हे कोणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल पण ते निर्माण झालं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. १९९२ म्हणजे नव्वदीच्या दशकात ज्या गावात शिक्षणाला फारसं महत्व दीलं जात नव्हतं त्या काळात रीटायर्ड मेजर श्री. महादेव गोविंद तोडकर ( MG आण्णा ) यांनी ग्रंथालयाची स्थापना केली आणी गावाला ज्ञानाच्या व्दारात उभा करण्याचं काम केलं. ज्ञानाचं दान तरूणांच्या पदरात देवून त्यांना सुशिक्षीत, सुसंस्कृत बनवण्याचं पहीलं पाउल नव्वदीच्या दशकात त्यांनी टाकलं.
लोकांनी शिकावं वाचावं आणी शहाणं व्हावं हीच मनोमन ईच्छा ठेवून ग्रंथालय सुरू झालं. ग्रामदैवत हनुमानाचा अशिर्वाद घेवून व त्याचचं नाव ग्रंथालयास देवून हनुमान सार्वजनीक वाचनालय, मिठारवाडी. या नावाने ग्रंथालय सुरू झालं व मुलांच्या लोकांच्या हातात नवनवी पुस्तकं पडू लागली. वाचनाची गोडी वाढत गेली. मुलं वाचु लागली पुस्तकं चाळू लागली, सुशिक्षीत होवू लागली, वाचनाची आवड निर्माण होवू लागली. ही आम्हा मुलांसाठी खुपचं अभिमानाची गोष्ट होती. कारण कोणतीही एक रूपयाची दमडी ही न खर्च करता आम्हाला हवं ते पुस्तकं फुकट वाचावयास मिळत होतं. एक ज्ञानाचं वारं या नीमीत्तानं वाहू लागलं व ग्रंथालय विस्तारू लागलं. पुस्तकं देणगी स्वरूपात मीळू लागली व वाचनाची भुक भागवू लागली.
काही काळासाठी ही ज्ञानाची भुक अतृप्त राहीली. लोकांच्या उदासीनतेमुळे शासनाच्या मदतीवीना हे कार्य थोडं शिथील झालं ही खंत MG आण्णांच्या मनात राहीली. त्यानी ती अनेकांना बोलुन दाखवली पण काही काळातच पुन्हा नव्याने या ज्ञानदानाच्या कार्याला पुन्हा गती आली. ती त्यांच्याच मुलांच्या प्रयत्नाने. २००३ साली पुन्हा नव्या जोमाने आण्णांच्या सोबतीने त्यांची मुले रमेश व उमेश यांच्या अथक प्रयत्नाने एक नाविन्यपुर्ण ग्रंथालय आकारास आले. तीच विनामुल्य सेवा आजतागायत अखंड ज्ञानदानाच्या स्वरूपात सुरू आहे. यासाठी रामचंद्र खुडे यांच ही सहकार्य लाभलं. त्यामुळे प्रत्येकाला हवं ते पुस्तक विना मोबदला मिळतयं ही खुपचं सर्व गावक-यांसाठी अभीमानाची गोष्ट आहे.
आज ग्रंथालय नव्या नावाने नव्या उमेदीने याचं गावात सुरू आहे. स्वतंत्र ईमारतीमध्ये सहा हजाराहून अधीक नामांकीत ग्रंथांना घेवून आठ लाखांहून अधिक रकमेच्या विविध विषयांना स्पर्श करत हे ग्रंथालय अविरत सुरू आहे. याचा आम्हाला खुप अभिमान वाटतोय, कारण ज्या काळात ग्रामीण भागात शिक्षणाची वनवन होती त्या काळात ग्रंथालयाच्या माध्यमातुन वाचन संस्कृती रूजवण्याचे काम MG आण्णांच्या माध्यमातुन होत होतं, ते आजही सुरू आहे. वयाची सत्याहत्तर वर्ष वय असुन सुद्धा अजुनही नविन आलेल्या पुस्तकांवर शिक्के मारून ती व्यवस्थीत ठेवण्याचं काम छंद म्हणुन आजही ते करतात. व ग्रंथालयाच्या कामकाजाचा आढावा सतत घेत असतात याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो.
त्यांचं हे कार्य ग्रंथालयाच्या माध्यमातुन तालुका, जिल्हा, राज्य, लेवल पर्यंत पोहचलं म्हणुन या ग्रंथालयास महाराष्ट्र शासनाचा डाँ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श ग्रंथालय पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर तालुका, जिल्हा, लेवलचे एकुण सात पुरस्कार ग्रंथालयास मिळाले. ही सर्व ग्रामस्थांसाठी खुपच अभीमानाची गोष्ट आहे. या ग्रंथालयाच्या माध्यमातुन गावातील अनेक मुले सुसंस्कृत, सुशिक्षीत, उच्चविध्याविभूषित झालीत म्हणून आम्हाला अत्यानंद होतोय. कारण ही सेवा माझ्या गावात सूरू झाली ती रूजली, वाढली, कल्पवृक्षाप्रमाणे बहारदार झाली. त्याच्या ज्ञानसावलीत बसुन माझ्यासारखी असंख्य मुलं ज्ञानानं समृद्ध झालीत ती फक्त आणी फक्त या ग्रंथालयामुळेच आणी MG आण्णांच्या दुरदृष्टीमुळे.
लेखक – उमेश महादेव तोडकर
Leave a Reply