नवीन लेखन...

निःशब्द निरोप (प्रस्थान)

न बोलता, न तक्रार करता निघून जायचे, हा आजकाल नव्या पिढीचा दस्तूर बनलाय. आणि कामावर येत असतील तरीही किमान काम ( भावनारहित, फक्त वेळेची नोंद) आणि महिनाखेरीचा पे चेक ! माझे एक वरिष्ठ सहकारी म्हणायचे-

” नितीन, मी दोन Punch आणि त्या दरम्यानचे एक Lunch” एवढ्यासाठी कंपनीत येतो.”

स्वतःच्या कामातून किमान अर्थ आणि आनंद मिळविणे आणि असमाधानी असणे हे तितकेसे नवे नाही. आपल्याकडे तक्रारी आहेत, कामगार संघटना आहेत, गाऱ्हाणे नोंदविण्यासाठी समिती आहे. ही आणि अशी असंख्य आयुधे पूर्वी हिरीरीने वापरली जात होती. शॉप फ्लोअर वरील वाद, भांडणे सततची असत आणि त्यामुळेही वातावरणात एक प्रकारचा जिवंतपणा खेळत असे.

पण मानसिक दृष्ट्या अलग होणं हे धोकादायक चिन्ह आहे.

कामाबद्दल थोड्याबहुत तक्रारी सर्वांच्याच कधी ना कधी असतात. ऍडम ग्रांट म्हणतो-

“It’s unusual to land a job that was designed for you, but it’s possible to tailor a job into one that suits you.”

“काम” म्हणजे नेमके काय असते आपल्यासाठी? उपजीविकेचे साधन, महिन्यातून एकवेळ हाती येणारी ठराविक रक्कम एवढंच ? यापलीकडे जाऊन कामाकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोन, त्यातून नवनवे अर्थ शोधून काढण्याचे प्रयत्न असं काही वेगळं करून बघता येईल का?

सामान्यपणे कामाकडे आर्थिक उत्पन्नाचे स्थिर साधन म्हणून बघण्याची सवय झालेली आहे. काहीजण आयुष्यात काहीतरी घडवून आणण्यासाठी करिअर म्हणून बघतात ज्यायोगे सामाजिक स्थान कमावता येतं(पद नांवाचा सोशल टॅग लावून) पण अंतरीची हाक, जी समाधान मिळवून देते, कृतज्ञतेचे/कृतार्थतेचे क्षण देते असं कामाकडे बघता येणार नाही कां?

समाधानाची उतरंड म्हणते-

जे कामाकडे पाट्या टाकणे असं बघतात, त्यांना किमान समाधान मिळते. ते मग परिघावरील प्रत्येक गोष्टींबद्दल सतत तक्रारीचा सूर काढण्यात धन्यता आणतात.

कामाकडे करिअर साध्य करण्यासाठी लागणारी शिडी म्हणून बघणारे काही प्रमाणात नक्कीच यशस्वी होतात कारण हेतू त्यांच्या नजरेसमोर स्वच्छ आणि स्पष्ट असतात. अशी मंडळी आपले जीवनहेतू साध्य झालेत की सरळ नोकरी सोडतात, किंवा साध्य होणार नाहीत असं दिसलं तरी निर्ममपणे नोकरीचा त्याग करतात आणि नवा शोध सुरु करतात.

काहीजणांना मात्र कामातील छुपी आव्हानं, समाधानाच्या लपलेल्या जागा अचूक दिसतात. मग ती आयुष्यात बरंच काही साध्य करून दाखवितात.

Fortunately, it is possible to reframe perceptions of work to find greater meaning and satisfaction.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..