जगातले शीतयुध्द आता संपले. झपाट्याने बदलत असलेल्या शासकीय नीतीनुसार झांझीबारला जगभरच्या व्यापार-शर्यतीत बेधडक उडी घेण्यासाठी सज्ज राहावे लागेल याची जाणीव या अहवालात प्रकर्षाने सादर होते. तसे पाहिले तर आफ्रिकेच्या पंचावन्न देशातही लोकांची निदर्शने, संघर्ष होत असतात. मात्र विकास आराखड्यांना होणाऱ्या विरोधाचे प्रमाण जवळजवळ नाहीच. आता झांझीबारमध्ये आहे प्रतिक्षा समृध्दीची. सध्या चालू आहे आराखड्याची कार्यवाही. यामुळे जागतीकीकरणाबरोबर व्यापार-अर्थ नीतीच्या उदारीकरणाची तयारीही देशाला करावी लागणार आहे. झांझीबार मसुद्यात संगणक जाळ्याच्या विस्ताराला विशेष महत्व दिले आहे. अंमलदारांचा व सामान्य माणसाचा आता एकच ध्यास आहे – आमचे दारिद्र्य लवकर संपावे आणि दहा लाख लोकवस्तीच्या या सुंदर बेटावर सुखाचे दिवस यावेत.
– अरुण मोकाशी
परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील लेखाचा हा अंश.
हा संपूर्ण लेख तसेच त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/
किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-
Leave a Reply