रडणे या साठी सुद्धा आवश्यक होते
कारण प्रत्येक वेळी मी शस्त्र उचलू शकत नव्हतो,
रडणे या साठी सुद्धा आवश्यक होते
कारण प्रत्येक वेळी क्रांति होणार नव्हती,
****
रडणे ऐकले की
मन निश्चिन्त झाले
प्रसव वेदनेने थकलेल्या शरीरात,
रडणे ऐकले की
चूल सारवताना बाळणअंतीच्या
छातीतून दूध पाझरले
******
रडणे असते साक्षी
संयोग-वियोग
जीवन-मरण
मान-अपमान
दुःख-सुख
ग्लानि-पश्चाताप
करुणा-क्षमा
व्यष्टि-समष्टि
प्रारब्ध आणि अंत या साठी
******
रडले की
नदी बनते पुण्यसलिला
आकाश बनते दयानिधि
मेघ बनतात अमृत
पृथ्वी बनते उर्वरा
वृक्षा वर उतरते नवे जीवन
फुलाना मिळतात नवे रंग
*****
रडणे विसरले की
पत्थर बनतात
मनुष्य हृदय,
ती भरली जातात काळोखाने
हिंसा पेटून उठते
सर्वत्र उठतात चीत्कार
थर थर कापते सृष्टि
*****
रडणे असले की
जीवन असते स्निग्ध
देत राहते धाडस
उगवते साहस
रुजवले जाते अंकुर क्षमाशीलतेचे
इतिहासाने जरी बनवले राजे महाराजे
तरी ते प्रेताच्या
ठिगारावर अश्रु ढाळतात
*******
स्त्री ला सांगितलेल्या कल्पित मिथकात
ती कथा सर्वात करुण आहे
ज्या मध्ये तिच्या रडन्याने
अश्रु बनतात मोती
आज पर्यंत ती माळ गुम्फुन स्त्री मिरवत आहे
पुरुष ती ‘नकली आहे ‘ सांगत
त्या माळीची इच्छा बाळगत आहे
****
रडणे आहे
सर्वांत सुंदर रचना
आपल्या अश्रुनी धुतली जातात
आपला आत्मा
रडणे
या साठी आवश्यक आहे की
मरण्याची इच्छा
अनेक तुकडयात जगत राहते
****
(मूळ हिंदी कविता ‘रोना’ – उपासना झा)
मराठी अनुवाद- विजय नगरकर
Leave a Reply