राधानगरी धरण परिसर …. डोंगरमाथा …
गूढरम्य …. बेलाग सह्याद्री …. !
माझ्या व्याकुळल्या मना …. नको साकळून राहू
सख्या आपुल्या गतीने तू मी निरंतर वाहू ….
नित्य चांगले स्मरावे .. ओखटे ते विसरावे
अहंतेचे द्वाडपण नीट ओळखून घ्यावे …..
आपुली ही पायपीट येथे थोडया दिवसांची
वाट पहाते पहाट सोसलेल्या अवसांची ….
साकळलेपणामुळे विष प्रसवते जिणे
तेच प्रवाहता पण सुखे उसविते गाणे ……
गडया माझ्या वाहू गाऊ रूप आकाशाचे ध्याऊ
पोळलेल्या धरे थोडी ओल देऊनिया जाऊ …..
— कविवर्य बा.भ. बोरकर
— प्रकाश पिटकर
Image © Prakash Pitkar….
Leave a Reply