राधे, केवढा केशसंभार,
जीव गुंतला त्यात फार,
का असे ते मोकळे सोडशी,
केसांची जादू मिरवशी, –!!!
रक्षक की मी या विश्वाचा,
दुसरा तिसरा नच” कोणता,
असे असूनही बघ किती,—
केशकलापां पडलो फशीं,–!!!
केस तुझे मानेवरून रुळती,
बटां -बटां वाऱ्यावर खेळती,
बघावे तेव्हा मनसोक्त डुलती, अडके त्यात जीव, हीच भीती–!!!
सुंदर काळेभोर कुंतल,
खूप त्यात खोल गुंतती,
त्यातच सुवासिक तेलगंध, रात्रं-दिन पाडे मोही,–!!!
तुझ्या गोऱ्या मुखड्यावर,
केसांची महिरप काळी,
गोजिरवाणे रूप तुझे,–
येते त्याला मादक झळाळी,–!!
जीवघेणा मदनबाण मारा,
कसे तुझे कुंतल, करिती,
या माऱ्याने सर्वस्व हरलो
तुजसाठी क्षणक्षण झुरलो,
द्वैतातील अद्वैत साधुनी,–
दोन जीव लागले प्रेमापाठी,–!!!
हिमगौरी कर्वे.©
खुपच छान.. तुमची कविता छान आहे आणि कार्य पण छान आहे..!
व्वा..व्वा…खूप छान.