मुरलीच्या सुरांत विसरली राधा सर्वाला
कुज बूज करुनी जन समजती वेडी ते तिजला
त्या सुरात कोणती जादू
ती किमया कशी मी वदू
सप्त सुरांचा निनाद उठुनी
खेचून घेती चित्ताला – – –
विसरली राधा सर्वाला
धेनु वत्से बावरली
बाल गोपाल आनंदली
रोम रोम ते पुलकित होऊनी
माना डोलती सुरतालाला – – –
विसरली राधा सर्वाला
प्रभूचा होता ध्यास मनी
ती बघे हरिला रात्रन दिनी
जे शब्द निघाले मुरलीतूनी
हाका मारती ते तिजला – – –
विसरली राधा सर्वाला
हरिच्या ओठ्ची भाषा
सुरात ऐकता येई नशा
तो नाद एकला कानी पडता
भाव समाधी लागली तिजला – – –
विसरली राधा सर्वाला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply