रागाच्या साऱ्या शब्दांवर
अनुराग ही अबोल झाला
न कळल्या अबोध वेदना
दुःखाचा थेंबही पापणीत मिटला
मनुष्य जन्म लाभला असा
तरी सार्थक भाव लोपला
न कळत्या जाणिवांना मग
कुठे किनारा न मिळाला
प्रेमच सुंदर अंतिम जीवनी
तरीही वेदनेचा डोह पेटला
अनुरागच जीव गुंतवी हृदयात
मोह मनात मोहक फुलता
जीवनात प्रश्न अनेक पडती
न उत्तरे मिळतात कित्येक प्रश्नांना
न कोडे सुटते आयुष्यात कितिक वेळी
परी प्रश्नांचा ओघ न कधी अलगद मिटला
मीच का रे रिंगणात उभी
फेर गोल सभोवती धरला
न सहज सुटले रिंगण हे
स्त्री जन्म हा असाच घुमतो नाच हा
उभे राहिले प्रश्न अनेक
कुठे चालले मन माझे आता
वळणावरील वळण सारे
कुठे नेतील या वळण वाटा
थेंब टपोरे अळवावरील हे
निसटून जातील क्षणात मोती धारा
उलगडेल का गहन हा खेळ सारा
आयुष्याचा मेळ कसा मग जुळावा
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply