नवीन लेखन...

रॅगिंग आत्महत्या का कायदा !

सासूने सूनेला सावत्र आईने मुलांना छळावे कैदेतून पळालेला किंवा सुटलेल्या कैद्याने मनातील उट्टे किंवा सल पूर्ण कारावी तसे रॅगिंग पीडीतांच्या बाबतीत होत आहे. समाजात सगळयाच क्षेत्रात बेशिस्त व अमर्यादा वेगाने वाढत असल्याने रॅगिंग ही दहशतीची झेरॉक्स प्रत झाली आहे. रॅगिंग हा संसर्गजन्य रोग आहे व त्यावर प्रभावी लस किंवा इंजिक्शनचीच गरज आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे आत्महत्या हेच याला एकमेव चिड आणणारे व आत्मचिंतन करायला लावणारे आहे. समाजाची मानसिकता बदलली तरच हे रोखू शकता येईल. मुलं माणसांच्या मनाचा व शारिरीक कमकुवतपणाचा अशी लांडगे मंडळी दादागिरी व दहशतीने नेहमीच गैर फायदा घेत असतात.

आपल्या देशात कितीही कडक कायदे केले तरी प्रश्न सुटत नाहीत. शपथेवर गुन्हेगार व साक्षीदार खोटे बोलताना आपण न्यायालयात बघतो. कायदा गाढव आहे असे म्हंटले जाते कारण गुन्हा शाबीत करण्यासाठी योग्यती कागदपत्रे वसाक्षीदारांची गरज असते. भ्रष्टाचाराने आणि दमदाटीने साक्षीदार फोडले जाण्याची शक्यता असते. कागद पत्रात पाहिजे तसा फेरफार केला जातो. कायद्याचा धाक राहिलेला नाही उलट पळवाटाच जास्त असतात असे नाईलाजाने म्हणावे लागते.

आजुबाजूला काय घटना घडतात याचा पालकांनी वेळोवेळी निरिक्षणाने अभ्यास करून पाल्याच्या मन व बुद्धीत चांगले संस्कार कसे वाढीस लागतील हे बघावे. मुलगा मुलीचे मित्र मैत्रिणी कोण आहेत रोज घरात किती वाजता येतात. मध्येच पॉकिट मनीचा हिशेब मागावा. पार्टी शक्यतोवर एकमेकांच्या घरी ठेवावी व त्यामध्ये पालकांनी आवर्जुन भाग घ्यावा. आर्थिक दृष्या श्रीमंत व गरीब मित्र असतील तर श्रीमंत मित्राचा प्रभाव जास्त पडण्याचा संभव असतो. बेगडी आयुष्य व वास्तव कसे तकलादु आहे याची उदाहरणे देऊन समजाऊन सांगावे. सिनेमा व सिरियल्स मध्ये कसा काल्पनीक आभास निर्माण केला जातो व जीवन जगताना कष्ट श्रद्धा सबूरी

व सचोटी राखण्याने आपल्या कुटुंबाचा व समाजाचा मानसिक व सामजिक स्थर कसा उंचावता येतो हे पटवावे.बर्‍याच कुटुंबात आज समाधान व तृप्ती दिसत नाही. हव्यासापायी कुटुंबात कुरबूरी दिसतात याने आईवडिलांत सततची भांडणे व विकोपास गेलेली नाती याने काही संसार डिव्हॉर्सच्या उंबरठयावर आहेत व याचे परिणाम कोवळया वयात मुलांवर होतात. मुलांना आई वडिलांबद्दल प्रेम माया आपुलकी आदर वाटेनासा होतो व तो राग मुलं वेगळया रितीने व्यक्त करतात असा अनुभव मी एका कुटुंबात बघीतलेला आहे. “वडयाचे तेल वांग्यावर” काढल्यासारखे सिनियर मुले चिड व राग ज्युनिअर मुलांवर काढताना दिसतात.

वाईट ते पहिले आत्मसात केले जाते कारण ते सोप्पे असते काही कष्ट पडत नाहीत पण चांगले मिळविण्यासाठी कष्ट व मेहनत घ्यावी लागते तसेच धीरही बाळगावा लागतो. आम्हांला त्याचे लगेच रिर्टन्स हवे असतात. आमच्याकडे वेळ नाही. मुल जसजसे मोठे होत जाते तसतसे त्या बालकावर आजुबाजूला घडणार्‍या घटनांचे पडसाद उमटत असतात. घरातील नात्यातील वआजुबाजूच्या कुटुंबीयांचे गैर व्यवहाराचे प्रतिबिंब कळत नकळत मुलांच्या कोवळया मनावर बिंबल्याने त्यांच्या वृ पालक वसरकारच्या कोर्टात आहे तो कसा पर्तवायचा हे ज्यानी त्यांनी ठरवावे किंवा कुणा चांगल्या मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्यावा.परंतू कुठल्याही गोष्टीत अपयश आले तरी त्याला न डगमगता धैर्याने पूढे जाऊन त्याचा योग्य तो सामना करता आला पाहिजेहे प्रत्येकाने लक्षात ठेऊन आत्महत्येसारखे हत्यार न उपास्ता श्रद्धा व सबूरी ठेवावी व परमात्मावर ठाम विश्वास ठेवावा.जगदीश पटवर्धन, बोरिवली

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..