रघुराम राजन यांचा जन्म भोपाळ, मध्यप्रदेश येथे तमिळ कुटुंबात झाला. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९६३ रोजी झाला. त्यांचे वडील भारतीय गुप्तवार्ता केंद्रात वरिष्ठ अधिकारी होते. राजन यांनी ७वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये घेतले. त्यांनी १९८५ साली आय.आय.टी मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. १९८७ साली राजन यांनी आयआयएम अहमदाबाद इथून उद्योग व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका संपादन केली. १९९१ साली राजन यांनी अमेरिकेतील मॅसाचुसेट्सच्या एमआयटीमधून व्यवस्थापनशास्त्रात पी.एच.डी. केली. राजन भारतीय अर्थ मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार होते. तसेच २००३ ते २००७ ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख अर्थतज्ज्ञ होते.
राजन रघुराम हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ते वयाच्या ४० व्या वर्षी प्रमुख झाले. राजन यांनी २००५ मध्ये शोध निबंध सादर करून आर्थिक मंदीचा अंदाज व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांचं म्हणणं हसण्यावारी नेण्यात आलं होतं. तीन वर्षांनतर रघुराम राजन यांची भविष्यवाणी खरी ठरली आणि अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत ओढली गेली. ४ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे २३ वे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. २०१७ साली नोबेल पुरस्कारासाठी रघुराम राजन यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. रघुराम राजन यांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसऱ्यांदा संधी मिळेल असे वाटले होते. परंतु, राजन हे आपला कार्यकाळ संपल्यानंतर शिकागो विद्यापीठातील स्कूल ऑफ बिझनेसमध्ये परत गेले होते.
राजन यांनी नंतर अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या आणि आपल्या मतात फरक असल्याचे म्हटले होते. यामध्ये नोटाबंदीचा एक निर्णय होता. त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply