केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म ११ जुलै १९५३ रोजी झाला.
१९९६ ते २०१४ या कालावधीत शिवसेना पक्षाचे सदस्य राहिलेले प्रभू राजापूर लोकसभा मतदारसंघामधून १९९६ ते २००४ दरम्यान सलग चार वेळा निवडून आले.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात उद्योग, उर्जा, अवजड उद्योग, पर्यावरण अशा महत्त्वपूर्ण खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. त्यावेळी प्रभू यांच्या कामाचे सर्वच राजकीय पक्षांनी कौतुक केले होते. त्यांच्या खासदारकीच्या काळात अनेक गावांत रस्ते पोहचवण्याचं काम केले. आजही त्यांच्या मतदारसंघात त्यांना मानाचं स्थान आहे. चार्टड अकाऊंटन्ट असलेले सुरेश प्रभू राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी सारस्वत बँकेच्या चेअरमनपदावर होते.
बाळासाहेब ठाकरे ह्यांनी प्रभूंना शिवसेनेत आणले व राजापूर मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट दिले. राजापूरमधून प्रभू सलग ४ वेळा लोकसभेवर निवडून आले. खासदार असताना १९९८ ते २००२ या काळात प्रभू ह्यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची मंत्रिपदे सांभाळली. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सुरेश प्रभूंसाठी आग्रह धरला होता. शपथविधीपूर्वी सुरेश प्रभू यांनी शिवसेनेचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला.
वाजपेयी यांच्या काळातील मंत्रीपदाचा तसेच विविध अभ्यास मंडळांवरील अनुभव आणि कार्यक्षमता लक्षात घेता सुरेश प्रभू रेल्वे खात्यात सध्या धडाकेबाज काम करत आहेत. पण ते नद्याजोड, उर्जा, तंत्रज्ञान क्षेत्रात जास्त माहीर आहेत. तसे मंत्रीपद त्यांना मिळाले असते तर ते जास्त योग्य झाले असते.
सुरेश प्रभु यांचे वैयक्तिक आयुष्य एकदम साधं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply