प्रभू रामाच्या पूण्यभूमिवरी सुखद काळ आला,
शुभ समयाला, देऊ या, आशिष विराज बाळाला,
देऊ या, आशिष विराज बाळाला, ।।
अन्
एक मुखाने म्हणूया सारे,
कुर्यात् बटोऽर्मंगलम् ।
कुर्यात् बटोऽर्मंगलम् ।।धृ।।क्षणांमागुनि क्षण हे सरता, वर्षे ही लोटली,
हळू हळू अंतर्यामी, पुत्र-प्रीत, फुलून आली ।
माय-पित्याच्या मनांत असते, प्रीत ती भाबडी,
पुत्रा योगे आली हांसत, ही आनंदाची घडी ।।
मधुराजाच्या पुष्पवाटिकीं क्षण सौख्याचा आला ।।१।।

जीव लावूनि बाळा वस्ती, सर्व स्वचि अर्पिले,
ईशापाशी, सदा तयाचे, मंगल ते प्रार्थिले ।
अविरत यत्नीं, आयुअमुचे, मधुगंधे फुलले,
माय-बापची अम्हां, ते ईश सम भासले ।।
श्री रेणु-प्रसादें, दिन मंगल हा आज उदेला ।।२।।
स्वागत करण्या, जयु राजाने, कंबर ही कसली,
साथीस अर्पू असतां, कुणा उणीव न कसली ।
अंतरी तयांच्या, प्रीती-दरवळ, आहे असली,
आपुलकीची गोऽड, ओऽढ, ही मनांत ठसली ।।
ऐसा नवनवलाईचा, भव्य सोहळा, इथे रंगला ।।३।।
-गुरुदास / सुरेश नाईक
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply