राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड जवळील देऊळगाव येथे झाला.
जिजामाता या राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. जिजामाता यांच्यावर अत्यंत कमी वयात कौटुंबिक जबाबदारी आली होती. त्यांचा विवाह वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत झाला होता. म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई यांच्या पोटी जिजामाता यांचा जन्म झाला होता. सिंदखेडजवळील देऊळगाव येथे त्यांचा जन्म झाला होता. यापूर्वी सिंदखेड नावाने ओळखले जाणारे ठिकाण बुलडाणा नावाने आता ओळखले जात आहे. राजमाता जिजाऊ या जाधव घराण्यातील होत्या, सिंधखेडचे लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत. जिजाऊ यांच्या आई म्हाळसाबाई या होत. जिजामाता यांचे लहान वयात लग्न झाले. वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. त्यामुळे अगदी कमी वयातच त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी पडली होती.
जिजामाता यांना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुले होते. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ रोजी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. ते आपले शिवाजी महाराज होत. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजे यांच्याजवळ मोठा झाला. तर शिवाजी महाराज यांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी घेतली होती.
जिजामाता यांचे मराठा साम्राज्यातील कार्याची दखल घेत भारत सरकारने १९९९ मध्ये त्यांच्या नावाचे टपाल तिकीटही जारी करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित ‘राजमाता जिजाऊ’ हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. ‘स्वराज्य जननी जिजामाता’ ही मालिका पण चालू होती.
राजमाता जिजाऊ यांच्या विषयी माहिती देणारी जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री – मेधा टिळेकर, जेधे शकावली, शिवभारत, जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले), गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव, अग्निरेखा अशी अनेक पुस्तके आहेत.
जिजामाता यांचे १७ जून १६७४ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply