नवीन लेखन...

रखुमाई रुसली

खूप दिवसांनी जवळच्या भजनी मंडळात जाऊन आले म्हणून थकले आणि सोसायटीच्या बाकावर बसले होते. तोच सखी शेजारीण जी नववधू आहे. लॉकडाऊन मुळे नवरा लॅपटॉप वर असतो. बाहेर हिंडणे फिरणे. शॉपिंग. हॉटेल सहल एकदम बंद. आणि घरातून काम. त्यामुळे तो असूनही नसल्यासारखा. तिचा उतरलेला चेहरा पाहून कळाले की ती नाराज आहे. त्यामुळे तिला बोलावले.जवळ बसून बोलताना मी म्हणाले नेहा आज किनयी मी एक नवीन गाणे ऐकले. खूप छान आहे. तिचे आजोळ खेड्यात असल्याने तिला भजन वगैरे माहित आहे. नेहा एकदा रखुमाई विठ्ठलावर रागावली आणि रुसून कोपर्यात बसली. हे ऐकून ती खुदकन हसली व आतुरतेने ऐकू लागली. तर ती का रुसली होती माहिती आहे का? ती म्हणाली तो तुकोबा चार अभंग लिहितो काय आणि आमचे हे त्याला विमान पाठवतात स्वर्गात जायला. ती जनी की फनी तिची वेणी फणी करतात. दळणकाडंण करतात. एवढेच नव्हे तर चक्क तिची लुगडी धुतात. त्या शिंपी नाम्याच्या पदावर अंगात आल्या सारखे नाचतात. पैठणला जाऊन एकनाथांच्या घरी चंदन उगाळून देतात. इथपर्यंत ठीक आहे पण पाणकी झाले. कधी न्हावी. कधी माळी. कधी चामडे वाळवले. दरबारी जाऊन जोहार मायबाप म्हणून कमरे पासून झुकले. कुंभार होऊन गाडगी मडकी बनवली. देव जाणे कुठे कुठे काय काय कामे केली कुणास ठाऊक…
प्रत्यक्ष देवच आहे तरीही रखुमाईं म्हणतात की देव जाणे. आता जगाची ही माऊली तिला हे सगळे करणे भागच आहे. कारण नेहा अग जेवढा व्याप तेवढा ताप असतो. त्या माऊलीला लेकरासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी असे करावे लागते. आणि आपण बायको म्हणून हेच करतो ना? अमूक एका नातेवाईकाला. मित्राला. कार्यालयातील सहकाऱ्यांना आणि बऱ्याच लोकांना मदत केली म्हणून चिडचिड करतो. अबोला धरतो. आणि तशीही आपली मागणी किती छोटीशी असते. एक गजरा. एक साडी. एक भांडे. एक दागिना. पण या सगळ्या व्यापातून ते करु शकले नाहीत तर आपल्याला वाईट वाटते. अग तुमच्या पिढीला हे सगळे हक्काने मागता येते आणि मिळतही पण आमच्या काळी आम्ही फक्त अपेक्षा करत होतो की नवऱ्याने एकदा तरी हे चांगले चवीचे आहे. तू दमलीस. तू माझ्या माणसांना आपली मानतेस पण मी तुझ्या साठी काही करु शकलो नाही.तुझी हौस भागवली नाही, वेळ दिला नाही.एवढे तरी म्हणावे पण…
अशा वेळी आम्ही रुसलो असतो का? नेहालाही कदाचित हे पटले असावे. चेहरा खुलला. आणि म्हणाली काकू चला आपण आमच्या कडे गरम गरम आलं घालून केलेला चहा घेऊ या. आता हे पण थकले असतीलच.. रखुमाईंचा रुसवा गेला की नाही माहित नाही पण या रखुमाईंचा मात्र नक्कीच गेला.आणी मला आयता चहा मिळाला.
— सौ कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..