नवीन लेखन...

कैलास जीवन स्किन क्रीम चे सर्वेसर्वा राम कोल्हटकर

कैलास जीवन स्किन क्रीम चे सर्वेसर्वा राम कोल्हटकर यांचा जन्म  १४ एप्रिल १९४७ रोजी पुणे येथे झाला.

‘कैलास जीवन’ नामक स्किन क्रीम शी बहुसंख्य मराठीजनाचा संपर्क बालपणीच येतो. कुठेतरी खरचटून किंवा हात भाजून घेऊन आलेल्या नातवंडाना एखादी आजी आपल्या थरथरत्या हातानी हळूवारपणे कैलास जीवन लावते आणि पिवळसर लोण्यासारख्या दिसणाऱ्या त्या क्रीमचा थंड स्पर्श आणि कापराचा वास त्या वेळी लक्षात राहतो तो कायमचा।
रोग अनेक इलाज एक ‘मल्टिपर्पज आयुर्वेदिक क्रिम कैलास जीवन’ ही जाहिरात माहीत नसलेली व्यक्ती शोधुनही सापडणार नाही. थेट हृदयाशी भिडणाच्या जाहिरातीतील ही ‘कँच लाईन’ जेवढी आपलीशी वाटते तेवढेच हे उत्पादन करणाऱ्या उद्योग समूहाचे अध्यक्षही आपलेसे वाटतात. खरे तर कैलास जीवन हे उत्पादन करणारी कंपनी व त्याचे अध्यक्ष हे मराठी व अरसल पुणेकर आहेत हे अनेक जणाना माहीत नसेल राम कोल्हटकर हे या अस्सल पुणेकराचे नाव.

आयुर्वेदिक औषधाच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या या उद्योग समूहाची स्थापना १९५६ साली झाली. त्याने आकार घेतला तो ७० व ८० च्या दशकात. अर्थात त्यासाठी कोल्हटकर यांना अथक मेहनत घ्यावी लागली. जन्माने तसेच कर्माने पुणेकर असलेल्या राम कोल्हटकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील प्रसिध्द एस.पी. कॉलेजमध्ये झाले. पुणे विद्यापीठातून त्यांनी मराठी मधून पदविका प्राप्त केली. त्यांनी मराठीतून एम . ए केल्याने ते कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सहजपणे काम करू शकले असते . पण राम कोल्हटकर यांचे मन मात्र शिक्षण क्षेत्रात कधीच गुंतने नाही. वडिलांनी सुरू कलेल्या उद्योग समूहाला आकार देण्याची मनीषा बाळगून ते या क्षेत्रात आत्मविश्वासाने उतरले . त्याकाळी एखादा उद्योग समूह स्थापन करुन तो यशस्वीपणे चालविणे हे आव्हानात्मक काम होते. पण राम कोल्हटकर यांनी ते स्वीकारुन यशस्वी करून दाखवले. त्यावेळी आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनात यंत्राचा वापर अजिबात केला जात नसे. तसेच या प्रकारच्या उत्पादनात तुपा ऐवजी प्रथमच खाेबरेल तेलाचा वापर करण्याची कल्पना राम कोल्हटकर यांना सुचली. वैद्यकीय परिभाषेत ‘इमल्सन’ म्हणून पचलित असलेली ही पध्दत रूढ करण्याचे सर्व श्रेय अर्थात त्यांना जाते. तेल व पाणी यांचे मिश्रण करून त्या पासून या औषधाची निर्मिती केली जाते.

‘शत धाैत’ अर्थात १०० वेळा धुवून स्वच्छ केलेले असा त्या काळी कैलास जीवनचा नावलौकिक होता व तो आजही कायम आहे. राम कोल्हटकर यांना या व्यवसायात खरी मदत मिळाली ती धाकटे बंधु विश्वनाथ कोल्हटकर यांची. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विश्वनाथ कोल्हटकर यांनी कंपनीच्या उत्पादन विभागात प्रवेश करून आपल्या कामाची जबाबदारी उचलली. त्यामुळे उत्पादनाच्या या माेठ्या जबाबदारीतून मोकळे झाल्याने आपणाला विक्री व व्यवस्थापन ही दोन क्षेत्रे चांगल्या त-हेने सांभाळता आल्याची कबुली राम कोल्हटकर देतात. ‘आयुर्वेद सशोधनालय पुणे प्रा: लि.’ या कंपनीतर्फे पुण्यातील धायरी येथे ‘कैलास जीवन’चे उत्पादन होते. जोडधंदा म्हणून १९५५ -५६ मध्ये जन्मास आलेल्या या स्किन क्रिमचे आगळे मार्केटिंग हे त्याचे आणखी एक वैशिष्टय होते.

पहिली जवळपास दहा वर्षे कीर्तनाच्या मध्यंतरात या क्रीमचे नाव आणि उपयोग जमलेल्या लोकांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न होत असे. पुण्यातील राजा केळकर संग्रहालयाच्या शेजारी असलेल्या कोल्हटकराच्या घरातील अदिती वामन मंदिर खुन्या मुरलीधराचे देऊळ, मोदी गणपती, सदाशिव पेठेत केसकर विठोबा कँपातील मारुती मंदिर, शिवाजीनगरचा रोकडोबा अशी सगळीकडे त्यांची कीर्तने होत. या निमित्ताने समाजाच्या सर्व स्तरातील लोकाना कैलास जीवन माहिती झाले. तारुण्यपिटिका त्वचेच्या इतर तक्रारी, भाजणे, मूळव्याध अशा विविध गोष्टीवर चालणारे व औषध म्हणून पोटातही घेता येणाऱ्या या क्रीमची ६० ग्रमची बाटली तेव्हा एक रुपयाला मिळे. सर्व कोल्हटकर कुटुंब हे कंपनीचे आताचे संचालक आहेत. विक्री व व्यवस्थापनाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागात राम कोल्हटकर यांनी प्रवास केला. विविध रोगांवर अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक क्रीमचा वापर औषध म्हणून केला जातो .

कैलास जीवनचे क्रीम ही सर्वांत मऊ व इलाजकारक असल्याची खात्री ते देतात.चंदनाचे तेल, दुवा, शंखजीरा, राळ, तेल तसेच पाण्याचे सममिश्रण करुन त्यापासून हे मऊ क्रीम तयार केला जात. केवळ भारतातच नव्हे तर जगात या प्रकारचे आयुर्वेदिक क्रीम कसे तयार केले जात नसल्याचा कोल्हटकर यांचा दावा आहे. या उत्पादनात कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल वापरले जात नसल्याने त्याचा परिणाम लगेच दिसून येता असे ही ते म्हणतात. ग्राहकाला कमीत कमी खर्चात हे क्रीम उपलब्ध व्हावे यासाठी हे क्रीम १२ ग्रँम पासून २० ग्रँम पर्यंतच्या ट्यूब मध्ये ही ते उपलब्ध केले आहे. विश्वास व सचोटी हे बीदवाक्य नेहमी पाळले जात असेही ते म्हणतात.

अव्याहतपणे काम करीत राहणे तसेच काम करताना त्यातून मिळणाऱ्या आनंदाची आठवण कायम ठेवणे कोल्हटकर यांना आवडते . संस्कृती आणि व्यापार यांचा अनोखा संगम असलेल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, सातारा, सांगली राज्याबाहरील कर्नाटकातील धारवाड, हुबळी ही शहरे त्यांना जास्त भावतात.

दर्जेदार साहित्याचे वाचन करणे तसेच शास्त्रीय संगीत एकण ते पसंत करतात. कुमार गंधर्व आपल्या घरी नेहमी येत असत यांची आठवण ते यानिमित्ताने व्यक्त करतात. पु ल देशपांडे यांचा सहवास अनेकदा लाभल्याने ते स्वत:ला भाग्यवान समजतात. पु.ल.च्या बरोबर श्री. ना. पेंडसे, य. दि .फडके यांची पुस्तक वाचणे त्यांना जादा आवडते . स्वतःला पसिध्दीपासून दूर ठेवलल्या कोल्हटकर यांचा आदर्श आयुर्वेदिक क्षेत्रातील अनेकांना निश्चितपणे उपयोगी पडल असाच आहे.

— अतुल माने.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..