नवीन लेखन...

आडनावांच्या नवलकथा मराठी आडनावात राम, रावण, वाघ आणि गाय.

प्रभू श्रीराम आमच्या संस्कृतीचा, आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच त्याला आमच्या मराठी आडनावात स्थान नमिळाल्यास नवलच म्हणावे लागेल. रामाशिवाय आमच्या जीवनाची गाडी/गाडा सुरळीत चालणे अशक्य असल्यामुळेच आमच्यात’रामगाडे’ आहेत. जमिनीत गाडणे या अर्थी रामाला गाडणारे ते ‘रामगाडे’ असणे शक्यच नाही.रामगिरीवार, रामगुडे, रामजोशी, रामटेककर, रामटेके, रामढोक, रामतीर्थकर,

रामद्वार, रामदंडी, रामदंडे, रामदास, रामदासी, रामदेरकर, रामधरणे, रामनवमीवाले, रामनाथकर, रामनामे, रामपर्तीवार, रामपूरकर, रामपुरे, रामरक्षे, रामराजकर, रामराजे,रामराव, रामले, रामाडे, रामाणी, रामाणे, रामायणे, रामिष्टे, रामीण, रामे, रामेकर, रामुगडे, रामेके आणि रामोशी अशी ‘राम’असलेली आडनावे माझ्या संग्रही ‘मराठी आडनाव कोशात’ आहेत. यापैकी बरीचशी आडनावे कशी रूढ झाली असावीत याचाअंदाज चटकन बांधता येतो.संग्रहातील आडनावांचा अभ्यास केला तर असे आढळते की काही आडनावांचे विशिष्ट गट आहेत. जात, व्यवसाय, घराणी, निवासवगैरेंचा त्या त्या आडनावांवर प्रभाव पडतो आणि विशिष्ट गट निर्माण होतात. आडनावांच्या शेवटी ‘गडे’ किंवा ‘गुडे’ असे शब्दअसलेली अनेक आडनावे आहेत. उदा. अदगडे, अरगडे, अंबागडे, उबगडे, घाटुगडे, तानुगडे, आटुगडे, गुईगडे, रेवगडे, देवगडे,भिवगडे, सागडे, लेंगडे, कोलंगडे, म्हारुगडे वगैरे. रामुगडे हे याच गटातले पण ‘राम’ असलेले आडनाव असावे. झगडे आणि लुगडेहेही याच गटात बसतात असे वाटते, पण तसे नसावे. कानगुडे, धायगुडे, काळगुडे, भरमगुडे, निरगुडे, सालगुडे, ससगुडे, चांदगुडे,सुरगुडे, अजगुडे, तरगुडे, किर्तगुडे, बामगुडे वगैरे आडनावांच्या गटात ‘रामगुडे’ बसतात.रामपुरी सुर्‍या आणि चाकू कुप्रसिद्ध आहेत कारण त्या हत्यारांनी मारामार्‍या केल्या जातात, खून केले जातात. हमखास ‘राम’ म्हणायला लावणारी ही हत्यारे तयार होणार्‍

ा रामपूर या गावी राहणारे ते ‘रामपुरे’ हे आडनाव धारण करून वावरतात.रामाचा कट्टर शत्रू म्हणजे रावण. रामाला मराठी आडनावात स्थान मिळाले मग रावणालाच का नसावे? रावण, रावणकर, रावणगावकर, रावणंग आणि रावणंगे अशी रावणधारी आडनावे माझ्या संग्रही आहेत.एकदा, काही कामानिमित्त, पंतनगर, घाटकोपर येथे राहणार्‍या श्री.

अरूण रावण यांची भेट झाली. काम आटोपल्यानंतर मी त्यांना, त्यांचे आडनाव कसे रूढ झाले ते कृपया सांगावे अशी विनंती केली. त्यांचे उत्तर त्यांच्याच शब्दात पुढे देत आहे.हे आडनाव माझे आजोबादेखील लावीत असत. त्यामुळे किती पिढ्यांपासून हे आडनाव चालत आले आहे हे नक्की सांगता येतनाही. आमचे पूर्वज महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरील, सांगली जिल्ह्यातील दिघंची या गावाचे रहिवाशी होते. त्यावेळी त्यांचे आडनाव ‘राव’ असे होते. गावची पाटीलकी आमच्याकडे होती. पाटलांना, ‘अण्णा’ असे गावकरी संबोधित. म्हणून आमच्या कुटुंब प्रमुखाला सगळे गावकरी ‘राव अण्णा’ असे म्हणायचे. पुढे रावण्णा, रावणा आणि रावण असा आमच्या आडनावाचा प्रवास झाला.रावण हे आडनाव धारण करून आपण आणि आपले कुटुंबीय सध्याच्या समाजात वावरता तेव्हा आपल्या आडनावा संबंधी शेजार्‍या पाजार्‍यांच्या, नातेवाईकांच्या किंवा जनमानसाच्या कोणत्या प्रतिक्रीया असतात? असे विचारले असता श्री. अरूण रावण म्हणाले की हे आडनाव ऐकून लोकांचे कुतूहल जागृत होते हे खरे आहे. नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना आता आमच्या आडनावाची सवय झाली आहे. हे आडनाव आम्हाला अजिबात बदलावेसे वाटत नाही, कारण या आडनावाचा रावणाशी काहीही संबंध नाही.महाराष्ट्रीय आडनावात बर्‍याच प्राण्यांना महत्त्वाचे स्थान आहे हे उदाहरणादाखल दिलेल्या काही आडनावांवरून पटते. अस्वले, उंटवाले, उंदीर, काळवीट, कुत्रे, श्वान, कोकरे, कोल्हे, खेकडे, गाढवे, गाय, गोम
, घोडे, घोरपडे, घोणस, घोणसे,जिराफे, झुरळे, डुकरे, डोंगळे, तरस, नागे, बकरे, बैले, बोकड, बोकडे, मुंगळे, मुंगी, मुंगे, सरडे, ससे, सापे, सांबरे, सिंह, हत्ती, हत्ते, हरणे वगैरे.वाघ हा हिंस्र प्राणी जंगलातच राहतो. काही देवदेवतांचे वाघ हे वाहन आहे. वाघ फार पूर्वीपासून माणसाळवलेला आहे याचा हापुरावा आहे. सर्कशीतल्या वाघांकडून अनेक विस्मयकारक कामे करून घेतली जातात याचा आपण अनुभव घेतलेला आहेच. जंगलात भरकटलेले वाघाचे पिल्लू पाळले तर त्याचे हिंस्रपण कमी होते. थोडक्यात म्हणजे माणसाचा आणि वाघाचा बराच सहवास आल्यामुळे, वाघाला मराठी आडनावात स्थान मिळाले असावे.मराठी आडनावांत ‘वाघ’ बराच लोकप्रिय दिसतो. त्या कुटुंबात कोणीतरी वाघासारखा पराक्रम केला असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव वाघाच्या स्वभावाशी मिळता-जुळता असेल म्हणजे वाघासारखा क्रूर किंवा दरारा निर्माण करणारा असेल म्हणून त्या कुटुंबाचे आडनाव ‘वाघ्ये, वाघ, वाघे किंवा वाघिरे’ असे रूढ झाले असावे.एखाद्याला वाघाच्या शिकारीचा छंद असल्यामुळे त्याने बर्‍याच वाघांची शिकार केलेली असावी म्हणून त्या कुटुंबाचे आडनाव ‘वाघमारे’ पडले असावे. परंतू वाघचोर, वाघचोरे किंवा वाघचौरे ही आडनावे रूढ झाल्याचे मात्र खरोखरच आश्चर्य वाटते. आता, वाघ ही काय चोरी करण्याची वस्तू आहे की चोरी करण्यासारखा प्राणी आहे? एखाद्या व्यक्तीची सर्कस वगैरे असावी म्हणून त्याने जंगलात जाऊन वाघ पकडून आणले असावेत म्हणून ते ‘वाघधरे’ झाले. तरीपण ‘वाघचोरे’ या आडनावाचे आश्चर्य वाटतेच. आता ‘वाघचोरे, वाघधरे’ ही आडनावे आपण पचविली पण, ‘वाघमोडे’ हे आडनाव मात्र अतीच झाले. वाघ ही काय मोडायची वस्तू आहे? परंतू वाघाला मोडण्याचाही पराक्रम कुणीतरी केला असावा.’वाघचवडे, वाघचवरे, वाघचौरे, वाघचौंडे’ ही आडनावे बहुतेक काही आडनावांचे अपभ्रंश असावेत. ‘वाघनखे किंव
वाघपंजे’ या आडनावांची माणसे जर तुमच्या आसपास वावरत असतील तर जरा जपूनच राहिले पाहिजे. ‘वाघडोळे’ हे आडनाव वाघासारखे लाल डोळे असल्यामुळे पडले असावे. ‘वाघमळे’ हे आडनाव कसे पडले असावे याचा मात्र अंदाज करता येत नाही.आडनावात वाघ असलेली आणखी काही आडनांवे – काळवाघे, तांबेवाघ, व्याघ्रळकर, वाघ्रळकर, वाघदर, वाघपांजर, वाघराळकर, वाघरी, वाघरु, वाघरे, वाघलगावकर, वाघवले, वाघसकर, वाघळकर, वाघळे, वाघंबे, वाघंबेकर, वाघाटे, वाघाडे, वाघापूरकर, वाघीकर वगैरे. वाघाचे कातडे अंगाभोवती गुंडाळून राहणारे ते ‘वाघवस्त्रे’ झाले असावे.कुठेतरी वाचल्याचं आठवतं की ईशान्य भारतात जमिनीच्या

आत वाढणार्‍या सुरणासारख्या कंदाला ‘वाघ’ असे म्हणतात. म्हणून अशा कंदांची लागवड करणारे

कुटुंब म्हणजे ‘वाघमळे’ असावे असे वाटते. ते कंद चोरणारे ‘वाघचौरे’ आणि कंद मोडणारे ‘वाघमोडे’ झाले असावेत. आणि काही आडनावातील ‘वाघ’ हा या कंदास अनुसरून असावा. तरीपण आसामातला कंदरूपी वाघ महाराष्ट्रीय आडनावात कसा आला हे गूढ राहतेच.वाघासारख्याच आडनावाच्या स्वरूपात ‘गाय’ हा प्राणी आहे. ‘गाय’ हे आडनाव तर आहेच शिवाय वाघासारखेच ‘गायचोर’ आणि ‘गायडोळे’ ही सुद्धा आडनावे आहेत. गायकर, गायकैवारी, गायचारे, गायतोंडे, गायधनी, गायदंडे, गायमार, गायमुखे ही सुद्धा आडनावे आहेत. ‘वाघमळे’ या आडनावासारखे ‘गायसमुद्रे’ हे ही आडनाव वैशिष्ठयपूर्ण वाटते. गायखे, गायगोळे, गायटे, गायधने, गायंगी ही आणखी काही ‘गाय’ असलेली आडनावे आहेत.केवळ उदाहरणादाखल काही आडनावांचा उल्लेख केला. त्या आडनावांच्या कुटुंबातील व्यक्तिंचा अनादर करण्याचा माझा मुळीच उद्देश नाही हे कृपया लक्षात घ्यावे.गजानन वामनाचार्यसोनमोहर, 180/4931 पंतनगर, घाटकोपर (पूर्व)मुंबई 400 075सोमवार 28 फेब्रुवारी 2011.

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..