रामदास भटकळ यांचा जन्म ५ जानेवारी १९३५ रोजी झाला.
रामदास भटकळ यांचे शालेय शिक्षण मुंबईतील रॉबर्ट मनी हायस्कूलमधून, कॉलेजचे एलफिन्स्टन कॉलेजमधून व गव्हर्नमेन्ट लॉ कॉलेजधून झाले. ते मुंबई विद्यापीठाचे एम.ए. (राज्यशास्त्र), एल.एल.बी. आहेत. १९५२ मध्ये पॉप्युलर बुक डेपोच्या मराठी प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी कामाला सुरूवात केली. तर १९५८ पासून इंग्रजी प्रकाशनाच्या कामाला सुरुवात केली. १९६१ साली प्रकाशन व्यवसायासंबंधी प्रशिक्षणासाठी लंडनच्या “इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेस”मध्ये तीन महिन्याची नोकरी करुन प्रकाशन कामाचा अनुभव घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या ग्रंथव्यवहाराचा अभ्यास देखील.
१९६५ रोजी यु.एस.स्टेट डिपार्टमेन्टच्या निमंत्रणावरुन अमेरिकन ग्रंथव्यवहाराचा अभ्यास केला. “बॉम्बे बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स असोशिएशन” व “कॅपेक्सिल” या निर्यातदारांच्या संस्थेच्या “बुक्स अॅन्ड पब्लिकेशन पॅनेल”चे अध्यक्षपद रामदास भटकळ यांनी भुषविले आहे.
“द पोलिटिकल आल्टर्नेटिव्हस इन इंडिया”, “जिगसॉ”, “मोहनमाया”, “जगदंबा”, “रिंगणाबाहेर” या पुस्तकांचे रामदास भटकळ यांनी लेखन केले आहे. “फ्रँकफुर्ट” येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात पाच वेळा सहभाग देखील नोंदवला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट प्रकाशनाच्या पहिल्या पुरस्काराचे भटकळ मानकरी आहेत.
रामदास भटकळ हे नाव प्रकाशक म्हणून येण्याआधी शे-दीडशे कार्यक्रमांमधून गायले होते. ऐन उमेदीच्या काळात त्यांनी रागदारी संगीताच्या मैफली गाजवल्या होत्या आणि बुवा, पंडित या उपाध्या मिरवल्या होत्या. भटकळांनी पंडित एस.सी.आर. भट यांच्याकडे त्यांनी काही वर्षं शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि मैफलीही केल्या.
संगीतकार यशवंत देव यांच्याकडे ते भावगीत शिकले होते, पण पुढे प्रकाशन व्यवसायाचा व्याप वाढल्यामुळे रामदास भटकळांना गाण्याकडे फारसे लक्ष देता आले नाही.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply