नवीन लेखन...

मराठी चित्रपटसृष्टीतील राजबिंडा नट रमेश देव

Ramesh Dev

रमेश देव यांचं आडनाव खरे तर ठाकूर देव यांचे बालपण कोल्हापुरात गेले.त्यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ रोजी झाला.

राजर्षी शाहू महाराजांमुळे त्यांचं आडनाव देव झालं. देव यांचे वडील त्या काळचे प्रसिद्ध फौजदारी वकील. महाराजांनी दिलेल्या स्कॉलरशिपवरच ते वकील झाले होते. एकदा एका कामात त्यांनी महाराजांना मदत केली तेव्हा महाराज म्हणाले, “”ठाकूर, तुम्ही देवासारखे भेटलात. तुम्ही आता ठाकूर नाही – देवच!‘‘ आणि तेव्हापासून या परिवाराचे देव हेच आडनाव झालं.

पु. ल. देशपांडे यांनी एका चित्रपटातील भूमिका नाकारली म्हणून देव यांना चित्रपटात संधी मिळाली. रमेश देव यांनी आजवर पाचशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट केले. आई, गुरू राजा परांजपे आणि पत्नी सीमा यांच्यामुळेच “रमेश देव‘ अशी वेगळी ओळख निर्माण झाली हे मात्र नक्की.‘‘ रमेश देव म्हणजे राजबिंडा नट. त्या काळात त्यांच्या देखणेपणावर अनेक मुली फिदा असायच्या.

१९५७ च्या सुमारास रमेश देव व सीमा (नलिनी सराफ) या दोघांचीही रूपेरी कारकीर्द सुरू झाली. “आलिया भोगाशी‘ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची सीमा यांच्याशी पहिली भेट झाली आणि त्यानंतर सहा वर्षांनी एक जुलै १९५३ ला त्यांचा विवाह झाला.

रमेश देवांच्या शिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही, एवढे मोठे योगदान त्यांचे आहे. एक काळ तर असा होता, की रमेश आणि त्यांची पत्नी सीमा देव चित्रपटात असतील तर तो हीट होणार अशी खात्री असायची. रमेश देव यांची कारकीर्द म्हणजे शिस्त व कामावर निष्ठा असलेल्या माणसाला कसे यश मिळते याचे उत्तम उदाहरण.

इंडस्ट्रीत वेळ पाळणारा नट म्हणूनच रमेश यांचं नाव घेतलं जातं. रमेश देव यांनी नायकाच्या भूमिका केल्याच, पण ते उठून दिसले ते खलनायकी भूमिकेत.

‘भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले.तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या.

निर्माता, दिग्दर्शक अशा विविध प्रांतातही ठसा उमटवला. त्याचा ‘सर्जा’ हा ऐताहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट चांगलाच गाजला. अनेक हिंदी चित्रपटातही त्यांनी उत्तमोत्तम भूमिका केल्या. ऋषीकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ चित्रपटात राजेश खन्नाचा डॉक्टर मित्र खरोखरीच मनापासून रंगवला. त्यांच्या या भूमिकेला दादही मिळाली. रमेश देव या व्यक्तीमध्ये उत्कृष्ट नायक होण्यासाठी लागणारे सौदर्य, मेहनत, अभिनय कौशल्य अशा सर्वच गोष्टी होत्या. जिद्द व मेहनतीच्या भरवशावर अभिनेता म्हणून प्रस्थापित होवून त्यांनी एकाहून एक सरस चित्रपट दिले व आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळविले.

संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी तर रमेश देव यांना “कोल्हापुरी‘ म्हणूनच ओळखते.

रमेश देव यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत २८५ हून अधिक हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट आणि ३० मराठी नाटकांमध्ये २०० हून अधिक शो केले.

त्यांनी फीचर फिल्म्स, टेलिव्हिजन मालिका आणि २५० हून अधिक जाहिरात चित्रपटांची निर्मिती देखील केली.

त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिका देखील दिग्दर्शित केल्या.

त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

रमेश देव यांचे चिरंजीव अजिंक्य देव अभिनेता व दिग्दर्शक आहेत तर दुसरे चिरंजीव अभिनव हा दिग्दर्शक आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट

रमेश देव यांनी अभिनय केलेले चित्रपट :
देवघर, भिंगरी, भैरवी, आधी‍ कळस मग पाया, बाप माझा ब्रम्हचारी, एक धागा सुखाचा, क्षण आला भाग्याचा, प्रेम आंधळ असतं, सोनियाची पाऊले, आंधळा मागतो एक डोळा, येरे माझ्या मागल्या, आलिया भोगासी, आई मला क्षमा कर, राम राम पाव्हण, अवघाची संसार, पसंत आहे मुलगी, यंदा कर्तव्य आहे, सात जन्माचे सोबती, जगाच्या पाठीवर, आलय दर्याला तुफान, दोस्त असावा असा.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on मराठी चित्रपटसृष्टीतील राजबिंडा नट रमेश देव

  1. तुम्ही जी रमेश देव जी बद्दल माहिती दिली, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत..धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..