माझ्या ऑफिसमधल्या परबकाकांच्या तोंडी हे पालुपद कायम असायचे. मुंबईत काम करणारे हे परब, शेकडो मैल लांब असलेल्या त्यांच्या या रामेश्वराच्या रेंजमध्ये कायमच असायचे. सिंधुदुर्गामधील आचरे येथील हा देव रामेश्वर म्हणजे मोठा जागृत देव ! भक्तांची देवावर श्रद्धाही तशीच गाढ. आपण कुठेही असलो आणि काही चुकीचं वागलो तर ” रामेश्वर बघता हा ” अशी भीती आणि काही संकट आले तर ” रामेश्वरा, बघतस ना, काय चल्ला ह्या ? ” अशी हाक. या देवाचे भस्मचर्चित आणि पूर्ण अलंकृत असे दोन्ही प्रकारचे फोटो मला काढायला मिळाले. कोकणातील देवळांमध्ये आढळणाऱ्या जांभ्या दगडाच्या आणि काळ्या पाषाणातील दीपमाळा येथेही उत्तम स्थितीत पाहायला मिळतात. ” रामेश्वरा, बघतस ना ? ”
–मकरंद करंदीकर.
Leave a Reply