रंग गुलाबी शराबी,गाली तुझ्या फुलले,
मदनबाण नयनातुनी, पाहता-पाहता निसटले,–!!!
जाई जुई कोमलांगी,
नाजूक तन साचे,
अंगकाठी शेलाटी,
सोनचाफ्याचे फूल नाचे,–!!!
वर्ण तुझा केतकी,
मिठास शब्द बोले,
कुंदकळ्यां नाजूकही,
दंतपंक्ती जणू भासे,–!!!
वाटे चालते-बोलते,
फूल तू सायली,
गेंद टपोरे झेंडूचे,
केशरवर्खी उरोजही,–!!!
जाता तू जवळुनी,
मनमोगरा फुलतसे,
उमलत हरेक पाकळी,
जिवाचे कमळ बहरतसे,–!!!
मंजुळ स्वर ऐकुनी,
भोवती सडा प्राजक्ती,
फुलांचा सुगंध येई,
सुंदरी तुझ्या सहवासें,–!!!
हिरवा चाफा दडुनी,
लज्जेत तुझ्या बसे,
प्रीत फुले मात्र फुलती,
काळजांची पर्वा नसे ,–!!!
सौंदर्याचा मी पुजारी,
विनवतो तुला प्रेमे,
प्रसन्न हो ग देवी,
भक्तकल्याणा कारणें,–!!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply