नवीन लेखन...

रंग चिकित्सा लेखांक 5 पूर्वाषाढा नक्षत्र

मागील लेखात आपण अश्विनी नक्षत्राचा त्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती वर काय आणि कसा परिणाम होतो हे जाणून घेतले. या लेखात आपण पूर्वाषाढा या नक्षत्राबद्दल माहिती घेऊन या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे, कोणते रंग या व्यक्तींना सकारात्मक ऊर्जा देऊ शकतात, कोणत्या व्यक्तीने वर्ज्य करावयास हवेत म्हणजे टाळायला हवेत वगैरे माहिती जाणून घेऊ.

नक्षत्र मालिकेतील विसाव्या क्रमांकाला हे नक्षत्र आहे. विसावा या शब्दाच्या उच्चारांमध्ये आपल्याला आशय गवसतो. विसावा याचा अर्थ एकोणीस नंतर येणारा अंक विसावा असा जरी असला तरी विसावा म्हणजे विश्रांती आराम तसेच मोठ्या प्रवासात थोडसं थांबलंच पाहिजे, पुढील कामासाठी निर्माण होणाऱ्या ऊर्जेसाठी… !!  असे विविध अर्थ निघतात.

पूर्वाषाढा या नक्षत्राचा अंमलच पूर्व दिशेकडे अधिक आहे. या नक्षत्राचा वृक्ष वेत वा पर्यायी वृक्ष अशोक आहे. वेत अर्थात आपण त्याला बांबू असेही संबोधतो. या वृक्षाचं वैशिष्टच असा आहे की, कठीणातील कठीण वस्तूला फोडून या वृक्षाचा  कोंब वा अंकुर हा बाहेर येऊ शकतो. पेरे किंवा ठराविक अंतराने कप्पे असलेला हा वृक्ष म्हणजे या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी फीनिक्स पक्षाची वृत्ती देते. कुठल्याही संकटावर मात करण्याची क्षमता ऊर्जा या वृक्षाजवळ असल्याने तो गुण या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी मध्ये येत असतो. दुसरा पर्यायी वृक्ष या नक्षत्रा साठी अशोक वृक्ष सांगितला आहे. शोक वा दुःखांवर मात करणारा किंवा दुःख वा शोक यांना गौण स्थान देणारा अर्थात अ-शोक. या वृक्षाच्या नावाला धारण करूनच सम्राट अशोक राजा हा त्रिखंडात कीर्तिमान झाला. रावणाने सीतेचे हरण करून लंकेत नेले तेव्हा अशोक वनातच ठेवले होते. नव्हे नव्हे –  अशोक वनातच सीतेला ठेवण्याची त्याला बुद्धी झाली. त्यामुळे शोकग्रस्त सीतामाईचा शोक संपत, हनुमंताने अशोक वनातच तिला रामाची मुद्रा देऊन शोकमुक्त करण्यासाठी पुढील मार्ग शोधला.

वेताच्या झाडाच्या तुलनेने अशोकाची झाडे आपणास बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळतात. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनीच काय इतरही व्यक्तींनी एखाद्या उपक्रमाला जाण्याअगोदर वा सुरुवात करण्याअगोदर दोन पाने अशोक वृक्षा सेवाभावी वृत्तीने जवळ खिशात घेऊन मगच घराबाहेर कामासाठी निघाले तर संकटे अडीअडचणी, अडथळे सहजपणे मुक्त होऊन ते काम लीलया पूर्ण झालेले आपल्या ध्यानात येईल.

भारतीय प्रतीक शास्त्रांच्या अनुभूतीचा प्रत्यक्ष अनुभव या वृत्ती द्वारे मिळतो. या व्यक्तींनी जर निरीक्षण केले तर त्यांच्या ध्यानात येईल की, त्यांना कॉटनचे कपडे , एक तर आवडत असतील किंवा त्यांच्या शिवाय इतर प्रकारची कपडे वापरा व त्यांना परका वा नावडता वाटत असावा.तसेच जर या व्यक्तींनी कॉटन कपडे परिधान केले तर यांची कामे होण्यास गती मिळेल. कारण कापूस या नक्षत्रास साठी धार्यौषधी व धारण करायची वनस्पती आहे.

या नक्षत्राची देवता उदक (आप) असून या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचा उत्कर्ष पाण्याकाठीच होतो. या नक्षत्राला आकाशात दोन तारका आहेत. दोन हा अंक देखील या व्यक्तींना लाभदायक ठरेल, हत्तीच्या दातांसारखी एक काल्पनिक आकृतींनी युक्त अशी त्यांची रचना आहे.या व्यक्तींनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्यास अधिक योग्य.

वसंत ऋतु हा कालावधी त्या वर्षासाठी उत्तम निर्णय घेण्यासाठी लाभदायक असतो. भावप्रकाश या ग्रंथात अशोक वृक्षाचं वर्णन आहे…

शीतल स्तिक्तो ग्राही वर्ण्य: कषायक: |
शोषापचीतृषादाट मिशोयविषास्त्रजित ||

अशोकाची साल आणि ब्राह्मीचे चूर्ण समसमान घेऊन एक कप दुधातून सहा महिने सेवन केल्यास या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींची तल्लख बुद्धी सह कुशाग्रता वाढेल.

“ॐ अदभ्यौंनमः” हा उद्या नक्षत्र देवतेचा जप आहे. भित्रेपणा, चंचलता, घाबरणे इत्यादी स्वभाव गुण या जपामुळे कमी कमी होतात आणि नंतर नष्ट होतात. प्रसिद्धी माध्यमे, गुणग्राही , खर्चिक दक्षतेने वागणारी आणि तामस गुणांसह दुसऱ्यांचे न्यून काढणारी अशी हि व्यक्ती असते. धनु राशिशी यांचे जमते.

पांढरा रंग, फिक्कट पिवळा , चंदेरी, फिक्कट हिरवा हे रंग या व्यक्तींनी कपड्यांसाठी वापरावे. गुरुवार हा यांच्यासाठी उत्तम.

व्यक्तींच्या आहारातही साधारण याच रंगांचे प्रभाव असलेले अन्न ठेवल्यास आणखीनच गतीने प्रभावी परिणाम दिसतील.

शुभम भवतु

– गजानन सिताराम शेपाळ

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 30 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..