नवीन लेखन...

रंग चिकित्सा – भाग ३

मागील लेखात आपण रंग किती प्रकारे आणि कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला लाभदायक ठरतात यावर चर्चा केली –  माहिती घेतली.  या लेखात आपण रंगांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रंग हा घटक म्हणजे ‘स्वयंभू’ चैतन्य आहे. हे चैतन्य मनावर आणि त्यानंतर ‘मेंदू’ असलेल्या शरीरावर अधिराज्य गाजवते. आपला जन्म – जन्मवेळ – जन्म ठिकाण हे सारं  एका ‘टाईम फॅक्टर’ मध्ये निश्चित बांधलेलं असतं. त्यानुसार जन्म कुंडली – जन्मराशी – अंकशास्त्रादी पुरातन आणि पारंपारिक शास्त्रांनी ‘त्या’ वेळेनुसार जन्म झालेल्या व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल मार्गदर्शनात्मक भाकित वर्तवलेले असते. यावर अनेक मत-मतांतरे आहेत. आपल्याला त्यात जायचे नाही. आपल्या विषयानुसार आपण राशी-नक्षत्र आणि जन्मवेळ इत्यादींची रंगांबरोबर सांगड घालून, त्याप्रमाणे आपल्यावर काय काय तसेच कोणते सकारात्मक परिणाम होऊ शकतात हे प्रत्येक नक्षत्रानुसार पाहणार आहोत.

बघा.. !! आपल्याला राशी – नक्षत्र वगैरे दिसत नाहीत मात्र रंग दिसतात. जी गोष्ट आपल्याला दिसते तीचं ज्ञान घ्यायला नव्हे व्हायला वेळ लागत नाही. ज्या बाबींचे ज्ञान होतं – आकलन होतं – त्यावर आपला चटकन विश्वास बसतो. विश्वास बसला तर उचित परिणाम व्हायला आपले मन आणि शरीर साथ देत असतं. आणि अद्भुतता वाटणारी ही ‘रंग चिकित्सा’ आपल्याशी कधी ऋणानुबंध प्रस्थापित करते हे कळत देखील नाही.

आपल्या जन्मकुंडलीत आपली राशी काय आहे हे दिलेलं असतं. त्यातच आपण ज्या वेळेला या जगात आलो होतो त्याची घड्याळी तासांमध्ये गणना केलेली असते. त्यावरून  चरण ठरलेलं असतं. त्यावेळेला ज्या नक्षत्रांचा प्रभाव असतो ते ‘नक्षत्र’ आपले ‘जन्म नक्षत्र’ ठरलेले असते.

त्या नक्षत्रानुसार आपण त्या त्या व्यक्तीने काय केले पाहिजे,  कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायला पाहिजे,  कोणत्या रंगाचा अधिक प्रभाव वाटणारे अन्न आहारात घेतले पाहिजे, कोणत्या देवतेचे स्मरण केलं पाहिजे, कोणता जप वा मंत्र वा श्लोक पठण केले पाहिजे, अशी सर्व माहिती घेणार आहोत.

‘थ्रु प्रोपर चॅनल’ असं आपण ऐकतो बोलतो. म्हणजे ‘योग्य मार्गाने जाणे’. साधनेत –  उपचारात देखील असंच असतं. आपण योग्य मार्गाचा अवलंब केला तर आणि तरच आपल्याला अपेक्षित परिणाम मिळणार आहे. चुकीच्या किंवा अंदाजाच्या मार्गाचा वापर केला तर परिणाम काय मिळतील हे सांगायला ज्योतिषाची गरज पडणार नाही.

डॉक्टरांवर विश्वास ठेवून आपण औषधे घेतो. अन् एका क्षणी व्याधीमुक्त झाल्याचा लाक्षणिक  का होईना परंतु सुखाची चव चाखतो. त्या औषधांमध्ये काय मिसळले आहे याचा आपण तसूभरही विचार करत नाही. तरीही त्या कंपन्या आणि डॉक्टर म्हणतात की ‘डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत.’

या शास्त्रात मी असं म्हणणार नाही. मी असं म्हणणार आहे की त्या त्या नक्षत्रानुसार ‘रंगोपचार’ कसे हवेत….ती माहिती देऊन तुम्ही म्हणजे इच्छुक वाचकाने स्वतःची अनुभूती घ्यावी. फक्त भीती नव्हे शंका एवढीच आहे की, तुम्हाला तुमच्या नक्षत्रानुसार कोणता किंवा कोणते रंग हे तुम्हाला लाभदायक – उपकारक आणि होकारात्मक परिणाम देणार आहेत हे समजलं पाहिजे.

कारण ‘मृग’ नक्षत्रावर जन्मलेली नवी दिल्लीतील व्यक्ती आणि त्याच नक्षत्रावर जन्मलेली नवी मुंबईतील व्यक्ती यांच्या जन्मवेळी नक्षत्र जरी सारखेच असले तरी जन्मस्थळ वेगवेगळे असल्याने त्या त्या ठिकाणी त्या नक्षत्राचा प्रभाव हा अक्षांश व रेखांश यांच्या मदतीने एका विशिष्ट क्षमतेचा आहे. ती ‘क्षमता’ कोणती हे समजणे उपचारकर्त्याला कठीण आहे. मग तक्त्यात दाखवलेला ‘रंग’ जरी एकच असला तरी त्याच्या छटा -उठावपणा हा जन्मस्थळानुसार भिन्न असू शकतो. म्हणून इच्छुकाला माझ्या सल्ल्याची गरज पडू शकते. असो… !!!

पुढील लेखात आपण नक्षत्र  नामावलीतील पहिल्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी काय रंगोपचार, कशाप्रकारे घेतले पाहिजेत याची माहिती घेऊ. अश्विनी नक्षत्रापासून आपण सुरुवात करू.

तूर्तास शुभम भवतु.. !!

— गजानन सिताराम शेपाळ

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 30 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..