रंगांसंबंधी आपण गेल्या तीन लेखांद्वारे माहिती घेतली. या लेखात आपण सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिल्या क्रमांकाचे नक्षत्र “अश्विनी”याचा मानवी जीवनावर कसा परिणाम होत असतो त्यावर माहिती मिळवु.
ह्या नक्षत्रावर ज्या व्यक्तिचा जन्म झालेला असेल त्या व्यक्तिने दैनंदिन व्यवहारात कोणकोणत्या बाबींचा विचार केल्यास अधिक सकारात्मक तसेच होकारात्मक वातावरण तयार होऊन स्वतःच्या कामांना अधिक गतिमान करता याचा विचार करावा…!!
अश्विनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष “कुचला” आणि पर्यायी वृक्ष “अडुळसा”आहे. या नक्षत्राची देवता अश्विनीकुमार आहे. आकाशात हे नक्षत्र तिन तारकांच्या रुपात पहावयास मिळते. हे तिन तारे अशा आकारात बद्ध आहेत की तो आकार घोड्याच्या मुखासारखा दिसतो.
या नक्षत्राच्या देवतेचा मंत्र आहे “ॐअश्विनीकुमाराभ्यां नमः”वायु तत्वाचा प्रभाव या नक्षत्रावर आहे. मेष राशी या नक्षत्राची असून राशी स्वामी मंगळ ग्रह आहे.
या नक्षत्राच्या मुहूर्तावर जन्मलेल्या व्यक्तिंनी पोटाचे विकारांपासून आराम, मज्जातंतूंचे विकार आणि लकव्या पासून मुक्ती या सह इतरही संबंधित व्याधींपासून दूर राहण्यासाठी काही रंगविषयक सूचना अवलंबिल्या तर चमत्कारिक बदल घडून येत असल्याचे त्याच उपचारकर्त्या व्यक्तीच्या ध्यानात येईल .
१ – त्या व्यक्तीने तिन च्या पटीत संख्येला प्राधान्य द्यावे….जसे पोळ्या वा फुलके तिनच खावेत,याच तारखांना म्हणजे तिन-बारा-एकवीस-तीस या दिवशीच शक्यतोवर महत्वाचे निर्णय घ्यावेत.
२ – या व्यक्तिंनी वर उल्लेखिलेल्या तारखांना लाल रंग आणि लाल रंगाच्या जवळच्या रंगाचे कपडे परिधान करावेत म्हणजे लालसर नारिंगी,स्कार्लेट रेड,पोस्टमन रेड,व्हर्मिलियन रेड इ.
३ – इतर तारखांना या व्यक्तीने पांढरा,फिक्कट पिवळा,चंदेरी,आकाशी अशा रंगांचा प्रभाव असलेले कपडे परिधान करावेत.
४ – या व्यक्तिंनी लाल रंगाच्या बाटलीत पिण्यासाठीचे पाणी घेऊन ते सूर्य प्रकाशात आठ तास ठेवावे नंतर पिण्यासाठी ऊपयोगात आणावे.
५ – या व्यक्तिंनी कुचला वृक्षाच्या जवळ जाऊन किंवा अडुळसा च्या जवळ जावून त्याला स्पर्श करुन वर नमूद केलेला जप किमान १०८ वेळा करावा. यावेळी त्या व्यक्तीच्या अंगात लाल रंगाचा प्रभाव असेल असे कपडे असावेत.
६ – जर वृक्ष मिळाला नाही तर त्या वृक्षाचा फोटो जवळ बाळगून त्याच्याकडे पहात जप वा प्रार्थना करावी.
७ – किमान तिन महिने आणि जास्तित जास्त सहा महिने हा ऊपचार केल्यास अद्भुत परिणाम मिळतील.
या पुढील लेखात आणखी एक नक्षत्र पाहू….!
।। शुभंभवतु ।।
— प्रा.गजानन सिताराम शेपाळ
रंगचिकित्सक
( सदर लेखमाला नक्षत्र क्रमांकानुसार नाही… प्रत्येक लेखात काहीतरी नवनवीन माहिती मिळणार आहे तेव्हा सर्व लेख आवर्जून वाचावेत.)
Leave a Reply