मराठी साहित्य संपदेत विपुल प्रमाणात बदल होत असतात म्हणूनच तिच्या सौंदर्याला अलंकारीकता प्राप्त होते! वाङ्मयकार याची निर्मिती करुन वाचकांना “शब्दानंदा”ची अनुभूती देत असतात. मुंबईच्या सुरेश नाईक यांनी मराठी साहित्यामध्ये विशेषत: काव्य प्रकारात वैचारिक, अध्यात्मिक, प्रवासवर्णनपर, व्यक्तीकेंद्रीत तसंच विनोदी स्वरुपाच्या दर्जेदार कविता रचल्या आहेत. प्रवासवर्णनावर आधारीत अश्या काव्यप्रकाची नाईकांच्या शब्दातच आस्वाद घेताना वेगळेपणाची जाणीव निश्चितच होत रहाते; कारण मराठी वाङ्मयात अश्या विषयावर क्वचितच कोणी रचना केल्या असतील.
प्रवासाची विशेष आवड असलेल्या सुरेश नाईक यांनी शब्दांतून केलेले वर्णन वाचण्या आणि ऐकण्यासारखेच आहे. म्हणुनच त्यांच्या काव्य मैफिलांच्या कार्यक्रमांना देखील रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यांच्या कवितांची व साहित्य निर्मितीचा भांडार जाणून घेण्यासाठी, त्यांच्या सोबत सागर मालाडकर यांनी केलेली बातचीत अवश्य ऐका. त्यासाठी या <) आयकॉन वर क्लिक करा
— सागर मालाडकर
Leave a Reply