राशी :- वृषभ
स्वामी :- शुक्र
देवता :- वासुदेव विश्वरूप
जप मंत्र :- ॐ ह्रीं विश्वरूपायनमः
उपास्यदेव :- दुर्गा देवी
रत्न :- हीरा
जन्माक्षर :- ओ औ इ उ ए ऐ वा व वीवि वु वू वे वं ई ऊ वृषभ राशीवर शुक्र (ज्योतिष)ग्रहाची मालकी आहे. ही रास कष्टाळूपणा, सोशीकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते. ही सम राशी आहे. कुंडलीतील समस्थानात सम राशी सामान्यत: बलवान असते असे
मानले जाते. ही स्थिर आणि पृथ्वी तत्वाची राशी आहे. तसेच ही चतुष्पाद राशी आहे. चतुष्पाद राशी दशम भावात बलवान असतात. ही पृष्ठोदय राशी आणि रात्रीबली राशी आहे. ही मध्यम प्रसव आहे. वृषभ ही रास चंद्राची रास आहे. या राशीच्या व्यक्ती तेजस्वी, बुद्धीमान असतात. लोकांना आपलेसे करणारी ही रास आहे.
Leave a Reply