मातृभूमीला मातृतुल्य मानले गेले आहे. ज्या देशाचे आपण नागरिक आहोत. ज्या भूमातेने आम्हास जन्म दिला. साधन-सुविधांच्या ‘माणूस’ बनवले ती भूमी खचितच आई आहे. म्हणूनच तर आम्ही आपल्या देशाला भारत माता संबोधतो. माणूस ज्या देशाचा नागरिक असतो तिथेच त्याला प्राथमिक शिक्षण व ज्ञान मिळत असते. त्याच्या निर्माण, प्रगती, समृद्धीत राष्ट्राची साधन संपत्ती कामी पडते आणि त्यामुळेच तो एक योग्य सुजाण नागरिक घडतो. ह्या दृष्टीने तर जननी आणि जन्मभूमी एकाच श्रेणीतील (समतुल्य) असून त्यांना स्वपक्षाही महान श्रेष्ठत्व प्रदान केले गेले आहे. कारण स्वर्गात तर फक्त सुख-आनंदच प्राप्त होतो पण आई जन्मभूमीच्या कुशीव आनंद प्राप्त बरोबरच योग्य पिढी आणि नागरिक देखील घडले जातात.
थोडक्यात असे की, ज्यायोगे युगधमांचे पालन होते. देशाची प्रगती होते, समाजात ऐक्य, समता, प्रेमावर आधारित असते. या सर्व गोष्टींचा समावेश राष्ट्रधर्मात आहे. प्रत्येकाने अशा कार्यात सहभागी होऊन सेवाधर्माचे पालन आणि राष्ट्रधर्माचे परिपालन करावयास हवे. आणीबाणीच्या परिस्थितीत राष्ट्रधर्म पालन करणे सर्वात मोठा पुण्य-परमार्थ आहे.
युगा-युगाच्या पारतंत्र्यांच्या बेड्या तोडून आम्ही स्वतंत्र झालो. स्वातंत्र्याचा खरा फायदा तेव्हाच होतो जेव्हा आम्ही चहुबाजूंनी विकासासाठी आवश्यक साधनसामग्रीची जुळवाजुळव करू शकू. आज आवश्यकता ह्या गोष्टीची आहे की, औद्योगिक विकास होऊन चांगल्या दर्जेदार वस्तूंचे उत्पादन व्हावे. कृषीविकास घडावा. उत्पादन वाढावे. आरोग्य साधनांच्या सुख-सोयीत वाढ व्हावी. संशोधनात वैज्ञानिकांचा सहभाग अधिक व्हावा.
याबरोबरच आणखी एक महत्त्वाचे असे की, राष्ट्रीय चारित्र्याचे उत्थान होणे अतिशय गरजेचे आहे. भौतिक उन्नतीला नैतिक उत्थानाची जोड मिळाली नाही तर ते विनाशाला कारणीभूत ठरू शकते. व्यक्ती-व्यक्ती मिळूनच समाज निर्माण होतो. ज्या समाजातील व्यक्ती मेहनती, प्रामाणिक, सत्यनिष्ठ, आदर्शप्रिय असतात असा समाज स्वयंमेव प्रगती शिखरावर पोहोचतो आणि राष्ट्र विकासासाठी पोषक वातावरण निर्माण होते. समाज व राष्ट्राच्या हितातच व्यक्तीहित आहे. ज्या राष्ट्रात सहानुभूतीपूर्ण हृदयगंगा प्रवाहित आहे अशा राष्ट्रातील माणसांचे जीवन कधीच उजाड होऊ शकत नाही.
–पं. श्रीराम शर्मा आचार्य
Leave a Reply