रस्ते मोकळे, प्रदूषण वितळे
धरतीस बहर आला
मनी पूजुनी बघा एकदा
देह तो शुद्ध झाला?
करावे उपाय ठरावी अंतरे
शुद्ध होउनी जावे
समर्थे जपावे मनी वसवावे
राखुनी मध्यंतरे!!
अर्थ–
काही दिवसातच पृथ्वी शुद्ध होऊ लागल्ये. प्रदूषणाची पातळी शून्याकडे झेप घेत्ये, तर पशू-पक्षांची संख्या वाढता वाढता वाढे होत चालली आहे. जिथे तासंतास आपली गाडी चालू ठेऊन सिग्नल मिळायची वाट पाहावी लागायची तिथे आता वारा राज्य करतोय. रिकामे रस्ते त्यांच्या बाजूला असलेली झाडं सुद्धा काव्य करायला लावू शकतात हे पटलं लोकांना. एका विषाणू मुळे एक चांगला झाल की सर्व पृथ्वीचं शुद्धीकरण होतंय. पण ह्या पलीकडे जाऊन विचार केला तर आपलं शुद्धीकरण होतंय का? आपण आजवर जी दिनचर्या जगत आलो त्या पेक्षा वेगळं काहीतरी जगतोय याने शरीराला पोषक काही मिळतंय की तलफ, डोकेदुखी यांसारखे आजार होतायत अजूनही आपल्याला.
यार किती दिवस झाले सिगरेट नाही प्यायलोय या lockdown मुळे, दारू ची आठवण येत्ये रे पासून नाक्यावरच्या टपरी वरचा चहा हवाय रे, तंबाखू सुटणार बहुतेक आता, पिझ्झा कधी मिळणार? इथपर्यंत विचार येऊन लोकं लाचार होऊ लागले याचा अर्थ धरती शुद्धीकरणाकडे जाऊ लागली, पण आपल्या शरीराचं काय? तो कधी शुद्ध होणार?
इथे परत श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मदतीला येतात. अशा गोष्टींना फाटा देण्यासाठी काय करावे? तर परत मनाचे श्लोक आले, रोज व्यायाम करणं आलं, विज्ञान सांगतं की जर एखादी सवय किंवा व्यसन 21 दिवस केले नाही तर ते सुटायचे चान्सेस 99 टक्के असतात, अहो मग आपला पहिला lockdown 21 दिवसंचाच होता की, या सारखी सुवर्णसंधी परत कधी मिळणार?
यावर उपाय म्हणून समर्थांचे विचार, चरित्र ऐकावं आणि मग वैराग्य नाही पण चांगलं आरोग्य तरी आपल्याला नक्कीच कमावता येईल.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply