रति अग्निहोत्रीने अनेक हिंदी चित्रपटात काम केले असून तिचा”एक दुजे के लिए’हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यांचा जन्म १० डिसेंबर १९६० रोजी मुंबई मध्ये झाला.
रतीने बॉलिवूडमध्ये या चित्रपटाने पाऊल ठेवले. या पहिल्याच चित्रपटाने रतीला रातोरात स्टार बनवले. हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटामुळे तिला ३ वर्षात ३२ तेलगु चित्रपटात काम करायाची संधी मिळाली. रतीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीची भूमिका केलीय. लग्नानंतर रतीने एक मोठ्ठा ब्रेक घेतला. यानंतर तब्बल सोळा वर्षांनी ‘कुछ खट्टी, कुछ मीठी’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.
या चित्रपटात तिने काजोलच्या ग्लॅमरस आईची भूमिका साकारली होती. अलीकडच्या काळात ‘शादी के साइड इफेक्ट्स’,‘सिंह इज ब्लिंग’ यासारख्या सिनेमात रती अलीकडे दिसली होती. रतीला तनूज नावाचा एक मुलगा आहे. ‘लव्ह यू सोनीयों’ या चित्रपटातून तनूजने बॉलिवूड डेब्यू केला.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply