वैदिक संस्कृतीचा प्रचार हा सर्व संप्रदायात प्रस्थापित करून त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न अनेक राष्ट्रात गेलेल्या आपल्या विद्वान पंडितांनी केला. ह्या संप्रदायाला तुर्कस्तान येथील महायान पंथी बौद्धांनीही ह्याला उच्च-स्थान प्राप्त करून दिले.
एन्डेअर येथे बुद्ध स्तूपाच्या भोवतालच्या वाळूत पंचारती पत्रा व लाकडी रंगीत फळ्या सापडल्या. त्यातील एका फळीवर रत्नजडीत
‘श्री गणेश’ भारतीय संस्कृतीनुरूप तर तुर्कस्तानच्या विशिष्ट लकबीसह असा पितींबर, त्यावर व्याघ्रचर्म, मस्तकावर नागाच्या वेटोळ्याचा मुकुट, असा हा श्रीगणेश येथे शिवपुत्र म्हणून ओळखला जात असावा असे वाटते. परंतू गळ्यात रुद्राक्षाच्या एवजी मोत्याची माळ दिसते हे त्याचे एक वैशिष्ठ्यच मानव लागेल.
ह्या गणेशाची आसन पद्धती पहिली असता जावा येथील श्री गणेशाप्रमाणे पाय ढोपरात मोडून तळवे एकमेकास जोडलेले. चतुर्भुज गणेशाच्या उजव्या हातात लाडू त्यावरील हातात छेदिका (बाण) डाव्या हातात मुळा व त्यावरील हातात परशु, दंडात व मनगटात तुर्कस्तानीय संस्काराप्रमाणे दागिने, सोंड, मोदक-पात्राकडे न वळता खाली डावीकडे झुकून पुन: मस्तकाच्या बाजूने वळून कानाकडे झुकलेली आहे. असे हे आगळे-वेगळे, विस्मयकारक गणेशाचे दर्शन घेत असताना आपणास असे आढळते की गादीवर विराजमान झालेला किंवा दोन मूषक वाहनांवर बसलेला असावा किंवा ते दोन (जादा) पाय असावेत असे काही शास्त्रज्ञांना वाढून त्यामागे तांत्रिक कारण असावे असे समजले जाते. हे सारे पाहून वैशिष्ठ्यपूर्ण किंवा नाविण्यपूर्ण असा हा श्री गणेश आहे असे म्हणावे लागेल. भारतीय संस्कृती प्रमाणे वर्णिलेले ‘रत्नखचित’ श्री गणेशाचे दर्शन आपणास तुर्कस्तान येथे घडते.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply