रात्र बहरली चंद्रप्रकाशे,
पाण्यावर तरंगती रजतकण,
फांदी फांदी झुकुनी त्यावरी,
धरते सावली रक्षण्या कणकण,-!
अंधार प्रकाशी खेळे कसा, चंद्रमा ढगां–ढगांत विराजे, पानापानातून रजत नक्षी,
सृष्टीवर रुपेरी प्रकाश पसरे,
कधी लपे सुधांशू हा,
या मेघातून त्या मेघात,
वातावरण जिवा वेड लावे,
जादूच फैलावे प्रेमीयुगलांत,-!
दूरवरीचे डोंगर बघती,
संथ शांत पाणी कसे,
कधी काळे कधी पांढरे,
कधी म्हणावे रुपेरी ही तसे,–!!!
हिमगौरी कर्वे
Leave a Reply