मला वाटते आज नव्याने जगावे
तुझ्या धुंद डोळ्यात मिसळुनी जावे
पुन्हा एकदा ती मधूर रात्र यावी
मिठीत तुझ्यासवे विसावून जावी ।
पुन्हा आठवे मज ती रात्र मिलनाची
थंडगार वारा अन ती रात्र चांदण्यांची
तशी रात्र मिलनाची पुन्हा जागवावी
रात्र सरली तरी ना कुणा जाग यावी ।
विसरावे सर्व जग हे तु मज जवळी येता
ना कुठल्याही दुःखाची आठवण यावी
मिसळावेत श्र्वासात श्र्वास अपुले
ना भीती कुणाची कुणा ही स्मरावी ।।
— सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
१० आक्टोंबर २०१८