[embedyt] https://www.youtube.com/watch?v=L5Sc91ir7E4[/embedyt]
बदलती लाइफस्टाईल, कामाचा वाढता स्ट्रेस यामुळे जगभरातील लोकांना चांगली झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. इतकेच काय तर झोप येण्यासाठी लोकांना झोपेच्या गोळ्याही घ्याव्या लागत आहेत. सोबतच झोप पूर्ण झाल्याने किंवा येत नसल्याने वजन वाढण्यासोबतच वेगवेगळे आजारही होत आहेत. पूर्वी लोक लवकर उठायचे आणि लवकर झोपायचे, पण सध्याच्या या धावपळीच्या युगात वेळ कधी निघून जाते ते कळत देखील नाही. रात्रीचे बारा-एक वाजले म्हणजे दुसरा दिवस सुरु झाला तरी लोक झोपत नाहीत किंवा त्यांना झोप लागत नाही. झोप हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. झोपेवर जगभरात संशोधन होत आहे. त्यातून संशोधकांनी झोपेबद्दल या महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. एक व्यक्ती दिवसातील 8 तास झोपते असं गृहित धरलं तर आपलं एक तृतीयांश आयुष्य झोपेतच जातं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या आयुष्यावर, आरोग्यावर एकूणच आपल्या दिनचर्येवर झोपेचा खूप मोठा प्रभाव असतो.
झोप पुरेशी न झाल्यास तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. जगभरात झोपेवर झालेल्या 153 हून अधिक संशोधनं तपासून पाहिल्यावर असं लक्षात आलं आहे की, झोप पुरेशी न घेतल्यामुळं हृदयरोग, रक्तदाब (ब्लडप्रेशर) आणि मधुमेहाचा (डायबिटीज) धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, अशात एका रिसर्चमधून झोपेची समस्या असणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे.
- नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनसार, झोपण्याच्या साधारण १ ते २ तासआधी आंघोळ केल्याने तुम्हाला चांगली झोप लागू शकते. म्हणजे तुम्हाला झोप न येण्याची समस्या आंघोळीने दूर केली जाऊ शकते. जे लोक झोपेच्या १ ते २ तासआधी आंघोळ करतात त्यांना चांगली झोप येते. झोपणे आणि जागणे यात शरीराच्या तापमानाची महत्त्वाची भूमिका असते. शरीराचं तापमान झोपताना सर्वात कमी असतं. दुपारी आणि सायंकाळी शरीराचं तापमान थोडं जास्त असतं.
- अनेक निरीक्षणांमधून हे सिद्ध झालं आहे की हर्बल टी लवकर झोप येण्यास कारणीभूत ठरू शकते. झोपण्यापूर्वी हर्बल टी घेतल्यास तुमचे डोळे लवकर जड होतात आणि काहीच वेळात तुम्ही झोपेच्या स्वाधीन होता.
- पुरेशी झोप न मिळाल्यामुळं आपली रोगप्रतिकार क्षमता कमी होते आणि लसीकरणाचा प्रभाव कमी होतो. जर समजा तुम्ही तीन रात्री सात तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेतली तर पुरेशी झोप घेतलेल्या लोकांच्या तुलनेत तुम्हाला सर्दी होण्याचा धोका अधिक असतो. झोप पुरेशी न घेतल्यामुळे वजन वाढू शकतं. त्याचं कारण असं आहे की झोप पुरेशी न झाल्यामुळं शरीरातलं ग्रेलिन नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढतं त्यामुळं तुम्हाला भूक लागली आहे असं वाटत राहतं.
- केळ्यामध्ये पोटेशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतात जे चांगल्या झोपेसाठी आवश्यक असतात. तसेच त्यामधील कार्बोहायड्रेट्स सुद्धा झोप येण्याच्या प्रक्रीयेमध्ये मदत करतात. या व्यतिरिक्त केळ्याचे आपल्या शरीरासाठी अनके फायदे आहेत. त्यामुळे झोपण्याच्या वेळेस एकतरी केळ जरूर खावं.
- दिवसातील वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी घरी आल्यावर चुकीच्या वेळी झोपतात किंवा कमी झोप घेतात. त्यांना मधुमेह आणि अतिरक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. शिफ्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचं नियमित वेळी काम करणाऱ्यांच्या तुलनेत आजारी पडण्याचं प्रमाण अधिक असतं.
- अतिझोपेचा किंवा कमी झोपेचा आपल्या बुद्धिमत्तेवरही परिणाम होतो. शिकणे व विचार करणे या प्रक्रियांमध्ये झोपेची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आपली एकाग्रता, सावधपणा, समस्या सोडवण्याची क्षमता इत्यादी गोष्टी टिकवून ठेवण्यासाठी आपल्या मेंदूत एक व्यवस्था आहे. या व्यवस्थेचे आरोग्य हे झोपेवर अवलंबून असते. अतिझोप झाल्यास या व्यवस्थेच्या कार्यावर परिणाम होतात व पर्यायाने आपल्या बुद्धिमत्तेवरही त्याचा परिणाम होतो.
झोप ही आपल्या आरोग्यासाठीची अत्यावश्यक क्रिया आहे; पण कुठल्याही गोष्टीची कमतरता किंवा अतिरेकही घातकच असतो. झोपेच्या बाबतीतही असेच होते. बर्याच जणांना खूप जास्तवेळ झोपण्याची किंवा खूपच कमी वेळ झोपण्याची सवय असते. या दोन्ही सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. झोपेच्या या समस्या, त्यांची कारणे व त्यांचे दुष्परिणाम याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती असणे व त्याबद्दल आपण जागरूक असणे खूप महत्त्वाचे आहे.
Mala 3 divas zale zop last nahi. Upay sanga na