रविवारला नवरा स्वयंपाकखोलीत घुसला
चल …आजतरी तुला मदत करतोच म्हणाला
मी म्हणाले ,मला आधी दिवाणखान्यात जावू द्या
पेपर वाचता वाचता तुमच्यासारख्या बातम्याही बघू द्या..
अगं, तुला मदत करायला आलो तर तुच बाहेर जाते!
भाजी पोळी करायला मला एकट्याला कुठे येते?
रोज कसं तुम्ही आँर्डर सोडता तशा आॅर्डरी मला करु द्या
कसं वाटतं मनामधी तुम्हालाही.. जरा अनुभव तर येवू द्या!
तो तयार झाला….लागला स्वंयपाकाच्या कामाला
हजार वेळा… डबा कुठाय,मसाला कुठाय..पातेलं कुठे वगैरे विचारत राहिला.
मला मेलीला, आॅर्डर करायची वेळच नाही दिली ..
येथून सांगण्यापेक्षा आत गेलेलं बरं.. म्हणून मीच खोलीत गेली
नवर्यांला संधी मिळाली तसा तो बाहेर सोफ्यावर पळाला
एक दिवस म्हणून आराम नाही आम्हा बायकांच्या जातीला
उद्यापासुन दिवाणखान्यातच गँस,ओटा,भांडे ठेवणार आहे
स्वंयपाकखोली नांवाचे तुरुंगाला सुंरुगच लावणार आहे!
— श्रीकांत पेटकर
Leave a Reply